ही साधी चुलीतली राख नाही तर…. हिचे आहे इतके महत्व

राखेमध्ये कोळसा असल्यामुळे भांडी स्वच्छ होतात. भांड्यांचा वास, तेलाचे डाग याशिवाय भांड्याची चमक वाढवण्यासाठी राख वापरतात. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचे रासायनिक घटक नसल्यामुळे राखेचा वापर करणं सुरक्षित मानलं जातं. यामुळे व्यक्तिला कोणतीही शारीरिक अॅलर्जी होऊ शकत नाही. राखेमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे तिचा खतांकरिता वापर करता येतो, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे

    सध्या ऑनलाइन मार्केटमध्ये चुलीतल्या राखेची मागणी वाढत आहे. आता कशासाठी म्हणाल तर अर्थातच भांडे घासण्यासाठी! पूर्वीच्या काळी चूल पेटवल्यानंतर तिच्यातून पडणाऱ्या राखेचा भांडी घासण्यासाठी वापर केला जायचा. या राखेने भांडीही लख्ख चमकायची. आता तोच फंडा नवीन रूपात आला आहे. हि चुलीतली राख आकर्षक पॅकिंगसह ई-कॉमर्स साईट ‘डिश वॉशिंग वुड एश’ या नावाने विकली जात आहे.

    तामिळनाडूमधील ही कंपनी या राखेचे मार्केटिंग डिश वॉशिंग वुड अॅश या नावानेच करत आहे. ऑनलाईन विक्रीकरिता उपलब्ध असणाऱ्या या राखेची किंमत २५० ग्रॅमकरिता ३९९ रुपये आणि एका किलोकरिता ६४० रुपये अशी आहे. भांडी स्वच्छ करण्याबरोबरच झाडांकरिता एक उत्तम खत म्हणूनही या पावडरचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहितीही ई-कॉमर्स कंपनीने दिली आहे.