इंटरनेट सेन्सेशन ठरतोय हा व्हिडीओ … Zomato प्रकरणाचे vesions बघून तुम्हीच ठरवा काय ते…

झोमॅटो (zomato) अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एका महिलने शेअर केला होता. त्यानंतर हे प्रकरण सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  झोमॅटो (zomato) अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एका महिलने शेअर केला होता. त्यानंतर हे प्रकरण सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावरुन सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. इतकचं नाही यावर मीम्स आणि जोक्सदेखील येत आहेत. यातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘chudarshan’ नावाच्या अकाऊंटमधून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून कोण योग्य आणि कोण अयोग्य असं काहीसं सांगण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ लोक पसंत करीत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Chudarshan (@chudarshan)

  या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी झोमॅटोच्या त्या प्रसंगाबाबत वेगवेगळ्या शक्यता दाखविताना दिसत आहे. हा व्हिडिओ लोक पसंत करीत आहेत. बंगळुरुमध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर मॉडेल हितेश चंद्राणीने आरोप केला होता की, त्याने तिच्या नाकावर मुक्का मारला. यानंतर मॉडेलने व्हिडिओ शेअर करुन तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. यावेळी तिच्या नाकातून रक्त येत होतं. यावर झोमॅटो डिलिव्हरी बॉयने मात्र त्यांच्यावर खोटा आरोप लावला जात असल्याचं सांगितलं. यानंतर देशभरात यावर जोरदार चर्चा केली जात आहे.