“ज्यांना भीती वाटतेय ते लोक सिंधियांसारखे आरएसएसमध्ये जाऊ शकतात” – राहुल गांधी

“मी नेहमीच तुमच्या सोबत असेल. घाबरु नका. तुम्ही तुमच्या भावाशी बोलत आहात.” काँग्रेसचा सर्वांना समान अधिकार देण्यावर भर असतो. तेच आरएसएस काही ठराविक लोकांनाच मोठ करण्यासाठी काम करते. असं राहुल यांनी म्हटलं आहे.

    राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की, “जे लोक भाजप आणि त्यांच्या पक्षाची भीती बाळगतात,  ते काँग्रेस सोडून आरएसएसमध्ये जाण्यास मोकळे आहेत.” यावेळी त्यांनी “त्यांना आपलं घर वाचवायचं होतं, त्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी आरएसएसचा मार्ग धरला” असं म्हणत त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर देखील निषाणा साधला आहे.

    पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रीयेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले की, “ज्यांना वास्तवाचा सामना करता येत नाही आणि भारतीय जनता पार्टीची भिती वाटते ते पक्ष सोडू शकतात. निर्भय नेत्यांना काँग्रेसमध्ये आणले पाहिजे.”

    राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना फेक न्यूजमुळे घाबरून न जाण्याचं आवाहन केलं. भाजपकडून येणाऱ्या फेक न्यूजमुळे घाबरून जाऊ नका. कोरोना काळात उत्तर प्रदेशात चांगलं काम केल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असतील तर त्यांच्यावर हसा. भारताच्या सीमाभागात चीनने घुसखोरी केली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील तर त्यांच्यावरही हसा, असं राहुल यांनी सांगितलं.

    गांधी म्हणाले, “मी नेहमीच तुमच्या सोबत असेल. घाबरु नका. तुम्ही तुमच्या भावाशी बोलत आहात.” काँग्रेसचा सर्वांना समान अधिकार देण्यावर भर असतो. तेच आरएसएस काही ठरावीक लोकांनाच मोठ करण्यासाठी काम करते. असं देखील राहुल यांनी म्हटलं आहे.

    गेल्या काही महिन्यांत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरल्याने राहुल गांधींच्या टीकेला महत्त्व येतं. पहिल्यांदाच काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी ‘झूम’च्या माध्यमातून पक्षाच्या सोशल मीडिया विभागातील ३,५०० कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यकर्त्यांशी संवाद साधला.