तीन महिन्यांनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुन्हा UP दौऱ्यावर ; अयोद्धेत देखील जाणार ?

२६ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती कोविंद दिल्लीहून लखनौला दाखल होणार आहेत. त्यानंतर बाबा भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. लखनौ येथील सैनिक शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त २७ ऑगस्ट रोजी पोस्टल स्टॅम्प प्रसिद्ध करणार आहे

    भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद तब्बल तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा यूपी दौऱ्यावर जाणार आहेत. 26 ऑगस्टपासून राष्ट्रपतींचा दौरा सुरू होणार असून कोविंद अयोद्धेत देखील जाणार आहेत आणि रामलल्लाचे दर्शन देखील घेणार असल्याचे सांगितलं जात आहे. राष्ट्रपती कोविंद २६ ऑगस्ट रोजी राजधानी लखनौला दाखल होणार आहेत.

    २६ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती कोविंद दिल्लीहून लखनौला दाखल होणार आहेत. त्यानंतर बाबा भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. लखनौ येथील सैनिक शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त २७ ऑगस्ट रोजी पोस्टल स्टॅम्प प्रसिद्ध करणार आहे. यासोबतच ते शाळेच्या हजार क्षमतेच्या सभागृहाचे उद्घाटन करतील. यानंतर ते शाळेत मुलींच्या वसतिगृहाची पायाभरणीही करणार आहे.

    राष्ट्रपती कोविंद २८ ऑगस्ट रोजी गोरखपूरला जाणार असून आयुष विद्यापीठाच्या पायाभरणी आणि गोरक्षनाथ विद्यापीठातील रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. तर २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता लखनऊच्या चारबाग स्टेशनवरून राष्ट्रपती ट्रेनने अयोध्येला दाखल होणार आहेत.