गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात सुमारे ६ लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी गुरुग्राम शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी २०० पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाची ६ वाहने, ५ जेसीबी, १२ हून अधिक रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. बचावकार्याचं काम सुरु असलं तरी त्या कामात पावसाचं व्यत्यय येत आहे. पण भर पावसातही बचाव कार्य सुरु आहे.

    हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यात रविवारी रात्री तीन मजली इमारत कोसळल्याने अपघात झाला. या दुर्घघटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघेजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात सुमारे ६ लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी गुरुग्राम शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    “आम्हाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल आहेत. सध्या बचाव कार्य जारी आहे”, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी दाखल झालेले DCP राजीव देसवाल यांनी दिली. घटनास्थळी २०० पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाची ६ वाहने, ५ जेसीबी, १२ हून अधिक रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. बचावकार्याचं काम सुरु असलं तरी त्या कामात पावसाचं व्यत्यय येत आहे. पण भर पावसातही बचाव कार्य सुरु आहे.

    मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात असलेल तरी हा अपघात कसा घडला याविषयी अद्याप कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही. बराचसा ढिगारा हटविला गेला आहे. त्याचबरोबर प्रशासनातील लोक अजूनही घटनास्थळी हजर आहेत.