jammu and kashmir

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्याचसोबतच एन्काऊंटर संपला असून तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

श्रीनगरमधील (Srinagar )  पंथा चौकात (Pantha Chowk ) दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. सलग दुसऱ्या दिवशी जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)  चकमक सुरू आहे. या चकमकीत एकूण तीन दहशतवाद्यांना (terrorists ) कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले असून एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्याचसोबतच एन्काऊंटर संपला असून तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

शनिवारी रात्री दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांकडून सीआरपीएफच्या ६१ बटालियन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. गेल्या दोन दिवसांतील चकमकीची ही तिसरी घटना आहे.