Nusrat-Jahan

बंगाली सिनेमातील अभिनेत्री आणि बशीरहाट येथील तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँला(nusrat jahan) ऑनलाईन जीवे मारण्याची धमकी(threatening) देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नुसरतने देवी दुर्गेच्या रूपात एक फोटोशूट केले होते. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर नुसरत धार्मिक द्वेषाची बळी ठरली आणि लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी नुसरतला जीवे मारण्याची धमकीही दिली.

दिल्ली: बंगाली सिनेमातील अभिनेत्री आणि बशीरहाट येथील तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँला(nusrat jahan) ऑनलाईन जीवे मारण्याची धमकी(threatening) देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नुसरतने देवी दुर्गेच्या रूपात एक फोटोशूट केले होते. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर नुसरत धार्मिक द्वेषाची बळी ठरली आणि लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी नुसरतला जीवे मारण्याची धमकीही दिली. या धमकीनंतर आता तिला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. नुसरतने हे फोटोशूट महालयाच्या निमित्ताने देवी दुर्गा म्हणून केले होते.

नुसरतच्या फोटोवर भाष्य करणाऱ्या एका यूझरने धमकी देण्याच्या हेतून लिहिले की, ‘तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. अल्लाहची भीती बाळग. तू तुझे शरीर झाकून ठेवू शकत नाहीस का? छी.. ! दुसऱ्या युझरने कमेंटमध्ये लिहिले की, तू तुझे नाव नुसरत जहाँ बदलून नूसू दास, घोष किंवा सेन असे काहीही ठेव, असे सल्ला देणाऱ्या धमक्याही तिला मिळाल्या आहेत.

दरम्यान नुसरत  सध्या लंडनमध्ये असून या धमक्या मिळाल्यानंतर तिने परराष्ट्र मंत्रालय(foreign ministry) आणि बंगाल सरकारला सुरक्षेची मागणी केली आहे. दुसरीकडे हे प्रकरण बंगाल सरकारनेही परराष्ट्र मंत्रालयासमोर उचलून धरले असून परराष्ट्र मंत्रालय लंडनमध्ये भारतीय उच्चायोगाच्या संपर्कात असल्याचे समजते. तिची सुरक्षा वाढविण्यावर विचार विनिमय केला जात आहे.