त्या सुधराव्यात म्हणून त्यांना सुधारगृहात ठेवलं खरं पण बिघडलेल्या त्यांनी पुन्हा त्याच वळणावर जाण्यासाठी निवडला असा मार्ग की…

जीबी रोडवरील कोठा क्रमांक ६४ मध्ये छापेमारी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी देह व्यापार करणाऱ्या १२ तरुणींची सुटका केली होती. या मुलींना द्वारकेतील एका शेल्टर होममध्ये ठेवण्यात आलं होतं.

    दिल्ली : देह व्यापारासाठी ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीतील GB रोडवरुन पोलिसांनी १२ तरुणींची सुटका केली होती. मात्र त्यांना जिथं ठेवण्यात आलं होतं, तेथूनच या तरुणी फरार झाल्या. तेथील एग्झॉस्ट फॅन तोडून त्या छिद्रातून तरुणींनी तेथून पळ काढला. आता पुन्हा त्या तरुणींना पकडण्यासाठी दिल्ली पोलीस प्रयत्न करीत आहेत. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी त्यांच्या नावासह फोटो वृत्तपत्रात छापला आहे.

    जीबी रोडवरील कोठा क्रमांक ६४ मध्ये छापेमारी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी देह व्यापार करणाऱ्या १२ तरुणींची सुटका केली होती. या मुलींना द्वारकेतील एका शेल्टर होममध्ये ठेवण्यात आलं होतं.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेल्टर होमच्या तिसऱ्या मजल्यावरुन या १२ तरुणी २४ मे रोजी एग्झॉस्ट फॅन तोडून त्या छिद्रातून फरार झाल्या. पळताना काही मुली जखमी झाल्या. तर काहींनी तेथून पळ काढला.

    या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी द्वारकेच्या सेक्टर २३ मधील पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला, मात्र त्या सापडत नसल्यामुळे पोलिसांनी तरुणीचे फोटो व नावासह वृत्तपत्रात जाहिरात दिली.

    through an exhaust fan hole 12 girls escape overnight search live for young women in the prostitution business