बंगालमध्ये ममता, आसाममध्ये भाजप सत्ता कायम राखणार, पाच राज्यांचे ओपिनियन पोल

या अहवालातील निरीक्षणानुसार पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. भाजपने या ठिकाणी आपली पूर्ण ताकद पणाला लावलीय. मात्र सध्याच्या वातावऱणानुसार ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरतील असा अंदाज या जनमत चाचणीत वर्तवण्यात आलाय. तर आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येईल, असा अंदाजही या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. 

  देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका मार्च महिनाअखेर आणि एप्रिल महिन्यात पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर कुठल्या राज्यात काय परिस्थिती आहे आणि जनमताचा कौल कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी टाईम्स नाऊ आणि सी व्होटरने केलेल्या निवडणूकपूर्व जनमत चाचणीचा अहवाल नुकताच जाहीर झालाय.

  या अहवालातील निरीक्षणानुसार पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. भाजपने या ठिकाणी आपली पूर्ण ताकद पणाला लावलीय. मात्र सध्याच्या वातावऱणानुसार ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरतील असा अंदाज या जनमत चाचणीत वर्तवण्यात आलाय. तर आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येईल, असा अंदाजही या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलाय.

  तमिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमके युती वरचढ ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सध्याच्या सत्ताधारी भाजप-अण्णाद्रमुक युतीची मतं आणि जागा कमी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर केरळमध्ये एलडीएफ सरकार थोड्या फरकानं का होईना, पुन्हा सत्ता मिळवण्यात यशस्वी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर पुदुच्चेरीत काँग्रेस-डीएमके युतीचा मोठा धक्का बसण्याची आणि भाजप युतीचं सरकार सत्तेत पुन्हा येण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आलाय.

  बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला बंगालमध्ये १०७ जागा मिळतील, असा अंदाज आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्या तुलनेत भाजपची कामगिरी कमालीची सुधारेल, असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीला केवळ ३३ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

  कुठल्या राज्यात कुणाला किती जागाांचा अंदाज?

  पश्चिम बंगाल

  तृणमूल काँग्रेस – १५४

  भाजप – १०७

  काँग्रेस आणि डावे – ३३

  आसाम

  एनडीए – ६७

  युपीए – ५७

  केरळ

  लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) – ५६

  भाजप – ०१

  तामिळनाडू 

  काँग्रेस-द्रमुक – १५८

  भाजप – अण्णाद्रमुक – ६५

  पुदुच्चेरी

  एनडीए – २०

  युपीए – १२