तंबाखूच्या सेवनामुळे कोरोना होण्याचा धोका अधिक

तंबाखू खाण्याचा परिणाम शरीरातील जवळपास सर्वच अवयवांवर होतो. कोरोनामुळे आपल्या फुफ्फुसांचे मोठे नुकसान होते. त्यात जर तंबाखूच्या किंवा धुम्रपानाच्या सेवनामुळे आधीच फुफ्फुसांचे कार्य बिघडले असले तर रुग्णांवर उपचार करणे आणखी कठीण होते. एका अभ्यासानुसार, धुम्रपान व तंबाखूमुळे कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण १.४ पट इतके आहे तर आयसीयूमध्ये दाखल होण्याची शक्यता २.४ पट इतकी आहे.

    जागतिक तंबाखूविरोधी दिन आज, सोमवारी जगभर पाळण्यात येत आहे. तंबाखूच्या अतिसेवनामुळे आधीपासून असलेल्या आजारात आणखी भर पडण्याची शक्यता असते. सध्या कोरोनाच्या महामारीत तंबाखूच्या अतिसेवनामुळे कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांवर उपचार करणे आणखी आव्हानात्मक झाले आहे. धुम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धुम्रपान करणाऱ्यामध्ये ३४ टक्के कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात तंबाखूच्या सेवनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी तंबाखूचे अतिसेवन करणाऱ्या ८ लाख लोकांचा फुफ्फुस आणि ह्रदयविकाराच्या आजाराने मृत्यू होत आहे. त्यातील ७ लाखांहून अधिक मृत्यू हे तंबाखूच्या तर इतर मृत्यू हे धुम्रपान केल्यामुळे होतात.

    कोणत्‍याही प्रकारे तंबाखूच्‍या सेवनामुळे गंभीर स्‍वरूपात करोनाचा धोका वाढतो. सीओपीडी, ब्रेन स्ट्रोक, हृदयविकार, दमा, फुफ्फुसांचा कॅन्सर, श्वसनविषयक आजार, फुफ्फुसांचे आजार, मधुमेह अशा आजारांचा धोका वाढत आहे. तरुण पिढी ताणतणावामुळे किंवा स्टाइल म्हणून तंबाखूसेवन, धूम्रपान करताना दिसते. त्यांच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता खराब होऊन त्यांना कोरोनाचा धोका आहे. तंबाखूचे सेवन किंवा धूम्रपान करताना तोंडावाटे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

    तंबाखू सेवनामुळे दररोज ३ हजार ५०० जणांचा मृत्यू
    ग्लोबल अँडल्ट टोबॅको सर्वे इंडिया शीटमध्ये असे सांगण्यात आहे की, २७ कोटी तंबाखू उत्पादक आणि ग्राहक असलेला भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, भारतात वर्षांला धुम्रपान केल्यामुळे ९.३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तंबाखू खाल्ल्याने ३.५ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. म्हणजेच दररोज भारतात ३ हजार ५०० लोकांचा मृत्यू होत आहे. यात ११ ते २५ टक्के पुरुषांचा सहभाग आहे तर १ ते १८ टक्के महिलांचा समावेश आहे.

    तंबाखूचा परिणाम शरीरातील सर्वच अवयवांवर
    तंबाखू खाण्याचा परिणाम शरीरातील जवळपास सर्वच अवयवांवर होतो. कोरोनामुळे आपल्या फुफ्फुसांचे मोठे नुकसान होते. त्यात जर तंबाखूच्या किंवा धुम्रपानाच्या सेवनामुळे आधीच फुफ्फुसांचे कार्य बिघडले असले तर रुग्णांवर उपचार करणे आणखी कठीण होते. एका अभ्यासानुसार, धुम्रपान व तंबाखूमुळे कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण १.४ पट इतके आहे तर आयसीयूमध्ये दाखल होण्याची शक्यता २.४ पट इतकी आहे.

    जवळजवळ २३ केस स्टडीच्या माध्यमातून असे दिसून आले आहे की, निकोटीन एक्सपोजरमुळे कोरोनासंबंधित हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार उद्द्भवु शकतात. तंबाखूचा वापर केवळ विषाणूजन्य संसर्गच होऊ शकत नाही तर त्याचे तीव्र परिणामदेखील होऊ शकते. याव्यतिरिक्त, तंबाखूचे धूम्रपान हे तीव्र कॉन्ट्रॅक्टिव पल्मोनरी रोगाचे प्रमुख कारण आहे, ज्यास गंभीर कोविड -१९ प्रकरणांमध्ये स्वतंत्र जोखीम घटक म्हणून ओळखले जाते. तंबाखूचा वापर आणि कोरोनाचा जवळचा संबंध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी असे म्हटले आहे की, तंबाखूमुळे ह्रदय, रक्तवाहिन्यासंबंधी आजार,कर्करोग,फुफ्फुसांचे आजार होण्याचा सर्वाधिक धोक आहे. त्याचबरोबर अशा रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याचाही सर्वाधिक धोका आहे. श्वास घेण्यास त्रास होणे हे केवळ कोरोना संसर्ग झालेल्या लोकांनाच नाहीतर धुम्रपान करणाऱ्यालाही होऊ शकतो. बिडी सारख्या वस्तूंचे धुम्रपान केल्याने क्रॉनिक ब्राँकायटिस आणि एम्फिसीमाचा धोका चारपटीने वाढतो त्यामुळे कोरोनाचा धोकाही वाढत आहे.