आज पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा ; जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

२४ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवल्यानंतर आज अखेर तेल कंपन्यांनी दरात बदल (Petrol Diesel Price Today) केले आहेत. आज पेट्रोलच्या किमती १८ पैसे तर डिझेलच्या किमती १७ पैशांनी कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं याचाच परिणाम देशातील पेट्रोल - डिझेलच्या किमतींवर झाला आहे.

    नवी दिल्ली : सरकारी कंपन्यांनी आज अनेक दिवसांनंतर सामान्य नागरिकांना दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या आहेत. २४ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवल्यानंतर आज अखेर तेल कंपन्यांनी दरात बदल (Petrol Diesel Price Today) केले आहेत.

    आज पेट्रोलच्या किमती १८ पैसे तर डिझेलच्या किमती १७ पैशांनी कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं याचाच परिणाम देशातील पेट्रोल – डिझेलच्या किमतींवर झाला आहे.

    आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १५ दिवसात दहा टक्क्यांनी घसरल्या आहेत. यूरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्यानं इंधनाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती ७१ डॉलर प्रति बॅलरवरुन ६४ डॉलरवर आल्या आहेत.

    मागील महिन्यात १० ते २६ फेब्रुवारी या काळात देशातील इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर ४ ते ५ रुपये प्रतिलीटरनं वाढवले होते. मात्र, २६ फेब्रुवारीनंतर क्रूड तेलाचे भाव ८ डॉलरहून अधिकनं वाढले आहेत. मात्र, यादरम्यान केवळ २७ फेब्रुवारीलाच काही प्रमाणात वाढ झाली आहे.