देशभर शेतकऱ्यांचा रोष असतानाही ३ कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी…महाराष्ट्र राज्य सरकारचा हा निर्णय

संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या तीन कृषी विधेयकांविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र असे असतानाही आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केली असून त्यांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या कायद्याबाबत महाराष्ट्र सरकार ठाम असून हे विधेयके राज्यात लागु न करण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेत आहे.

लोकसभेत मंजूर झालेले कृषी विधेयक नुकतेच राज्यसभेत मंजूर करण्यात आले. मात्र यावेळी विरोधकांनी या विधेयकाविरोधात नाराजी व्यक्त करत गदारोळ घातला. मात्र विरोधकांचे म्हणणे न ऐकून घेताच सत्ताधार्यांनी आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करून घेतले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला. तसेच दुसरीकडे ही विधेयकं शेतकर्‍यांंच्या हिताची नसल्याचे म्हणत अजुनही देशभ विरोध होत आहे. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी स्वाक्षरी करुन मान्यता दिली आहे. या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. यावरुनच भाजपाचा (BJP) मित्र पक्ष शिरोमणी अकाली दल (Akali Dal) याने NDA मधुन आपला सहभाग देखील काढुन घेतला आहे

शेतकरी विरोधी कायदा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
संसदेत मंंजुरी मिळालेले विधेयकंं हे शेतकरी विरोधी असल्याने महाविकास आघाडी संपुर्णतः या विधेयकाच्या विरोधात आहे, हे विधेयकं महाराष्ट्रात लागु होऊ देणार नाही याची काळजी घेऊ अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.