dont download or install these seven apps bank account may be empty nrvb

देशात जानेवारी २०२१ मध्ये ९६ लाख दूरसंचार ग्राहकांची वाढ झाली असून ही संख्या एकूण ११८.३४ कोटींवर(mobile users in India) पोहोचली आहे. इंटरनेटही(internet users in India) ७४.७४ कोटींपेक्षा वाढून ७५.७६ कोटी लोकांपर्यंत पोहोचला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ३१ जानेवारी २०२१ पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे.

  दिल्ली: देशात जानेवारी २०२१ मध्ये ९६ लाख दूरसंचार ग्राहकांची वाढ झाली असून ही संख्या एकूण ११८.३४ कोटींवर पोहोचली आहे. इंटरनेटही ७४.७४ कोटींपेक्षा वाढून ७५.७६ कोटी लोकांपर्यंत पोहोचला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ३१ जानेवारी २०२१ पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात हे तथ्य समोर आले आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, रिलायन्स जियोचे ३५.०३%, एयरटेलचे २९.६२%, व्होडाफोन आयडिया २४.५८%, बीएसएनल १०.२१% तर एमटीएनएलचे ०.२८ टक्के ग्राहक आहेत.

  ग्राहकसंख्येत वाढ – ६.४५% पश्चिम उत्तर प्रदेश, ०.९१% हिमाचल, ०.८३% दिल्ली, ०.६७% पूर्व उत्तर प्रदेश, ०.२१% हरयाणा, ०.०९% पंजाब, (मुंबईत ०.२८% घट)

  महिनाभरात एक कोटी नवे कनेक्शन
  भारतात ७५.८७६कोटी नागरिकांपर्यंत ब्रॉडबँड पोहोचला असून त्यापैकी ७३.४२ कोटी इंटरनेट मोबाईल फोनद्वारे प्राप्त केले जात आहे. डिसेंबरमध्ये ७४.७४ कोटी लोकांकडे इंटरनेट होता. याचाच अर्ध एक महिन्यात यात १.३६ टक्के वाढ झाली.

  १०० पैकी ८७ जणांकडे फोन
  दरम्यान, प्रत्येक १०० लोकांपैकी ८७ जणांकडे फोन नंबर सक्रिय असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यात दिल्ली अग्रक्रमावर असून येथे १०० लोकांमागे २७४ फोन क्रमांक आहेत. तर बिहार माघारला असून येथे ही टक्केवारी ५३.११% आहे.