कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा अखेर रद्द , पीएम मोदींचा मोठा निर्णय

देशभरातील कोरोनामुळे झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी 12 वीच्या परीक्षा होणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून भारत सरकारने बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सीबीएसईच्या बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी आज राज्ये व इतर भागधारकांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    या बैठकीला सीबीएसईचे अध्यक्ष उपस्थित होते. याशिवाय या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरही सहभागी होते.