जगभरात पुन्हा एकदा ट्विटर डाऊन ; अडीच तासानंतर सेवा पूर्ववत, अनेक युजर्सला फटका

संपूर्ण जगभरात ट्विटर डाऊन (Twitter down ) झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक युजर्सना (users) याचा फटका बसला असून ट्विटर अकाऊंटवरील अपडेट (Update) दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ट्विटरकडूनही याला दुजोरा देण्यात आला असून सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

संपूर्ण जगभरात ट्विटर डाऊन (Twitter down ) झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक युजर्सना (users) याचा फटका बसला असून ट्विटर अकाऊंटवरील अपडेट (Update) दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ट्विटरकडूनही याला दुजोरा देण्यात आला असून सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीच्या मायक्रोब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग साइटवर काही यूजर्स काहीही पोस्ट करू शकत नाहीत आणि त्यांना ते वापरण्यात अडचणी येत आहेत. हे इंटरनल सिस्टममधील (Internal System) एखाद्या समस्येमुळे होत आहे, असे ट्विटरने म्हटले आहे.

कंपनीने एक ट्विट करून माहिती दिली की, ते ही समस्या ठिक करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. ही समस्या कोणत्याही हॅकिंग किंवा सुरक्षेतील गडबडीमुळे झालेली नाही. आज पहाटेपासून युजर्सना ट्वीटरवर अपडेट दिसत नव्हते. मात्र एक ते दीड तासानंतर ट्विटर पुन्हा एकदा व्यवस्थित सुरु झाल्याचं सांगण्यात आल. याच दरम्यान अनेक देशांमध्ये #TwitterDown हा हॅशटॅगही हा सोशल मीडियावर ट्रेंड होत होता. याबाबत ट्वीटरने देखील निवेदन सादर केले आहे.

अडीच तासानंतर सेवा पूर्ववत

सुमारे अडीच तासानंतर ट्विटरची सेवा पूर्ववत झाली आहे. आता वापरकर्त्यांना कोणतीही समस्या येत नाही आहे. अधिकृतपणे माहिती सामायिक करताना कंपनीने सांगितलं की ट्विटर पूर्ववत झालं आहे. तुमच्या संयमाबद्दल सर्वांचे आभार.

समारे दोन आठवड्यांपूर्वी सुद्धा ट्विटर अशाच प्रकारे डाऊन झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी जगभरातील अनेक देशात ट्विटर सेवा ठप्प झाली होती. ही समस्या वेबसाइट, अँड्रॉयड आणि आयओएस तिन्ही प्लॅटफॉर्मवर होती.