नवीन आयटी कायद्यांचं पालन करण्यात ट्विटर अपयशी : रविशंकर प्रसाद

रविशंकर प्रसाद म्हणाले, ट्विटरला सरकारने अनेक संधी दिल्या परंतु ट्विटरने प्रत्येक वेळी नियमांकडे दुर्लक्ष केलं. भारतीय संस्कृती आपल्या मोठ्या भौगोलिक स्थानाप्रमाणे बदलत राहिली आहे. सोशल मीडियावर एक लहानशी चूकही मोठं कारण ठरू शकते. फेक न्यूजचा मोठा धोका आहे. यावर कंट्रोल करणं आणि रोखणं हा नव्या आयटी नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण नियम होतो, परंतु याचं ट्विटरने पालन केलं नाही.

    नवी दिल्ली : केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एकामागून एक ट्विट करत या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘ट्विटरवर भारतात कायदेशीर संरक्षणाचा हक्क आहे की नाही याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु 26 मे पासून अस्तित्त्वात आलेल्या नवीन आयटी कायद्यांचं पालन करण्यात ट्विटर अपयशी ठरलं आहे.

    आयटी कायद्याच्या कलम 79 नुसार ट्विटरला हे कायदेशीर संरक्षण मिळतं. या कलमानुसार ट्विटरला कोणतीही कायदेशीर कारवाई, मानहानी किंवा दंड करण्यापासून सूट दिली आहे. परंतु आता कायदेशीर संरक्षण संपताच ट्विटरविरुद्ध पहिला गुन्हा उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये दाखल झाला आहे.