vankayya naidu

ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू(Wyankayya Naidu) यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील ब्लू टिक(Blue Tick) काढून टाकली होती. मात्र याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर ट्विटरने(Twitter) आपली चूक सुधारली आहे.

    देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्लू टिक’वरून शनिवारी गोंधळ उडाला होता. ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू(Wyankayya Naidu) यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील ब्लू टिक(Blue Tick) काढून टाकली होती. मात्र याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर ट्विटरने(Twitter) आपली चूक सुधारली आहे.

    उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्याला ब्लू टिक देण्यात आलेला आहे. मात्र, हा ब्लू टिक ट्विटरकडून हटवण्यात आला असल्याचं शनिवारी दिसून आलं. यावरून खूप चर्चा झाली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्यानं सरकारने आणि भाजपाने नाराजी व्यक्त केली होती. यावरून ट्विटरवर टीकाही सुरू झाली. ट्विटरने पुन्हा ब्लू टिक दिली आहे.

    ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचं नाव बदललं गेलं असेल किंवा एखादं अकाउंट सक्रिय नसेल वा अपडेट होत नसेल तर ते अनव्हेरिफाइड केलं जातं आणि ‘ब्लू टिक’ही हटवली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल मात्र नंतर त्यानं कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील तर ब्लू टिक हटवली जाते.उपराष्ट्रपती झाल्यापासून व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतींच्या हॅण्डलचाच वापर करत आहेत. त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलचा वापर होत नसल्यामुळे ब्लू टिक काढून टाकण्यात आली असावी, असं सांगितलं जात आहे.

    माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या कृतीबद्दल ट्विटरकडे नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणी ट्विटरवर योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. त्यानंतर ट्विटरने आपली चूक दुरुस्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं.