Now you will know the price of petrol in your city with one click, you have to do this work nrsj

माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी(bedi) क्रिकेटसंदर्भातील ट्विट्समुळे अनेकदा चर्चेत असतात. रविवारीही ट्विट (tweet) करताना त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढीव दरांवर(petrol diesel prize hike) चिंता व्यक्त केली.

दिल्ली : माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी(bedi) क्रिकेटसंदर्भातील ट्विट्समुळे अनेकदा चर्चेत असतात. रविवारीही ट्विट (tweet) करताना त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढीव दरांवर(petrol diesel prize hike) चिंता व्यक्त केली. त्यांची ट्विटरवरील चिंता व्यक्त होताच थरुर यांनाही सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करण्याची आयतीच संधी मिळाली व तसा प्रयत्नही त्यांनी केला पण बिशनसिंह बेदी यांनी टाकलेल्या ‘गुगली’मुळे थरूर यांच्यावरच त्रिफळाचित होण्याची वेळ आली.

काँग्रेस नेते तसेच क्रिकेटपटू यांच्यातील ट्विटर वॉरमुळे मात्र यूझर्सची करमणूक तेवढी झाली. मी माझ्या एका जवळच्या मित्रासोबत चर्चा करीत होते जो एका गॅस स्टेशनचा मालकही आहे. पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमती गुन्हेगारी स्वरूपाच्या आहेत. तरीही कोणीच या विरोधात तक्रार करीत नाही अशी चिंता त्याने व्यक्त केली. हा देश कुठे चालला आहे की सामान्य होत आहे हेच कळत नाही असे ट्विट बिशनसिंह बेदी यांनी केले.

सत्ताधाऱ्यांकडे बहुमत त्यामुळेच…

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी बिशनसिंह बेदी यांच्या ट्विटवरून चौक मारण्याचा प्रयत्न करीत ट्विट केले की विरोधकही याची तक्रार करणार आहेत. याबाबत मी अनेकदा ट्विटही केले, संसदेतही मुद्दा उचलून धरला. आपल्या टॅक्स हॅप्पी सरकारद्वारे वाढविण्यात आलेल्या या किमतीविरोधात काँग्रेस सोशल मीडियावर मोहीमही राबवित आहे. परंतु निवडणुकीत बहुमत मिळाले असल्याने सत्ताधाऱ्यांना काहीही करण्याची सूट असल्याचे मत त्यांनी नोंदविले आहे असे ट्विट थरुर यांनी केले.

देशात विरोधी पक्ष आहे ? बेदींचा पलटवार

थरूर यांचे ट्विट येताच बेदींच्या पलटवारामुळे थरूर यांची बोलतीच बंद झाली. देशात विरोध करण्यालायक विरोधी पक्ष आहे का? की काँग्रेसच्या घरातच सर्व आलबेल आहे? असा सवाल सवाल बिशनसिंह बेदी यांनी केला.दिशाहिन देश पाहून मलाही दु:ख होते असे बिशनसिंह बेदी म्हणाले. यासाठी आपण सर्वजण जबाबदार असून जे आपल्याला प्राप्त होत आहे आपण त्याच्याच लायकीचे आहोत असा विश्वासही दिला जात आहे अशा शब्दात बेदींनी पलटवार केला. बेदींच्या या उत्तरावर नेटकऱ्यांनी तर त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीच शिवाय थरूर यांच्यावरही टीका केली.