शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर

लोकसभेनंतर राज्यसभेमध्ये (Rajya Sabha) विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयके मंजूर (Two bills ) करण्यात आली आहेत. यातील कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक २०२० ही विधेयकं राज्यसभेत देखील मंजूर झाली आहेत. या दरम्यान सभागृहात मोठा गोंधळ उडाल्यानंतर उपसभापती हरिवंश यांनी राज्यसभा उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली: कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत (Lok sabha) मंजूर झाली होती. लोकसभेनंतर राज्यसभेमध्ये (Rajya Sabha) विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयके मंजूर (Two bills ) करण्यात आली आहेत. यातील कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक २०२० ही विधेयकं राज्यसभेत देखील मंजूर झाली आहेत. या दरम्यान सभागृहात मोठा गोंधळ उडाल्यानंतर उपसभापती हरिवंश यांनी राज्यसभा उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

कृषी क्षेत्रातील महत्वाच्या तीन विधेयकांना लोकसभेत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या बिलांवरुन राज्यसभेत मात्र घमासान सुरु आहे. हे बिल म्हणजे शेतकऱ्यांचं डेथ सर्टिफिकेट असल्याचं काँग्रेसनं (Congress)  म्हटलं आहे. तर ही विधेयके मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का? त्यानंतर यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची ग्वाही सरकार देणार का?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे. तसेच पंजाब, महाराष्ट्रासह या विधेयकांचा अन्य काही राज्यांनी विरोध केला आहे.

या विधेयकांमुळं काय होणार

‘एक देश एक बाजार समिती’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणं. तसेच शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बाहेरही संधी उपलब्ध करुण देणं, हा या अध्यादेशाचा मूळ उद्देश आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कुठेही करता येईल, असा सरकारचा दावा आहे. या अध्यादेशामुळे शेतकरी बंधनमुक्त होईल. शेतकऱ्यांना देशात कुठंही शेतमाल विक्री करण्याची परवानगी मिळेल. असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे.