two girls from pok have been repatriated from chakan da bagh crossing point today

उपलब्ध माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमधील कहुता तालुक्यातील निवासी लाईबा जबैर (१७ वर्ष) आणि तिची छोटी बहीण सना जबैर (१३ वर्ष) दोघींना भारतीय सैन्याने सीमेपार आल्याने रविवारी ताब्यात घेतलं होतं.

नवी दिल्ली : चुकून लोकं सीमेपार येतात असं अनेकदा झालं आहे. त्यानंतर एक लांबलचक कायदेशीर प्रक्रियेतून प्रत्येकालाच जावे लागते. या संपूर्ण प्रक्रियेत किती वेळ जाईल हे सांगणं तसं कठिणच आहे. सीमा ओलांडणाऱ्या व्यक्तीच्या मनात एक भीती बसलेली असते की, त्या देशातील सैन्य आपल्याला कशाप्रकारची वागणूक देणार पण, भारतीय सैन्याने शेजारील देशासमोर एक आदर्श ठेवला आहे.

मुलींची केली पाठवणी

रविवारी पाकव्याप्त (PoK) काश्मीरमधील दोन मुली चुकून भारतीय हद्दीत दाखल झाल्या होत्या. भारतीय सैन्याच्या नजरेत आल्याने त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांची पुन्हा पाठवणी करण्यात आली आहे. दोन्ही मुली जम्मू-काशमीरच्या पुंछ मध्ये भारताच्या हद्दीत दाखल झाल्या होत्या, आज त्यांना चाकन दा बाग क्रॉसिंग पॉइंट येथून पुन्हा पाकिस्तानात पाठविण्यात आलं आहे.

 

नकळत केला होता भारतीय हद्दीत प्रवेश

उपलब्ध माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमधील कहुता तालुक्यातील रहिवासी असलेल्या लाईबा जबैर (१७ वर्ष) आणि तिची लहान बहीण सना जबैर (१३ वर्ष) भारतीय सैन्याने सीमेपार आल्यानंतर रविवारी त्यांना ताब्यात घेतलं होतं. अब्बासपूरच्या दोन मुली पाकव्याप्त काश्मीरमधील (Pok) च्या कहुता तालुक्यातील रहिवासी आहेत. नकळत त्यांनी पुंछ येथे भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता. त्यांची आज चाकन दा बाग (सीडीबी) क्रॉसिंग पॉइंट येथून त्यांच्या देशात पाठवणी करण्यात आल्याची माहिती सरंक्षण प्रवक्त्याने दिली.

मुलींनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

या दोन्ही मुलींना सीबीडी या ठिकाणी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. सीमारेषा ओलांडणाऱ्या मुलींपैकी एक लाईबा जबैर म्हणाली, आम्ही वाट चुकलो होतो आणि भारतीय हद्दीत प्रवेश केला. आमच्या मनात एक भीती होती की, भारतीय सैन्य आमचा छळ करतील पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली. आम्हाला वाटलं होतं की, आम्हाला पुन्हा घरी जाताच येणार नाही परंतु आज आमची मायदेशी पाठवणी करण्यात येत आहे. भारतीय लोक खूप चांगले आहेत.