तोंडात लपवून करत होते १ किलो सोन्याची तस्करी, कस्टमवाल्यांनी चलाखी पकडली अन्…

एएनआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ग्रीन चॅनेलमध्ये दुबईहून येणाऱ्या उझबेकिस्तानचे २ नागरिक इंदिरा गांधी विमानतळावर पकडले गेले. शोधाशोध केली असता त्यांच्या तोंडातून ९५१ ग्रॅम सोने आणि धातूची साखळी जप्त करण्यात आली. त्यांनी दातांवर सोन्याचा मुलामा चढवला होता आणि त्यांच्या तोंडात साखळी ठेवली होती.

  तस्करीची एक विचित्र पद्धत …

  तस्कर सोने आणि इतर महागड्या धातूंची विचित्र पद्धतीने तस्करी करतात. पण भावा, कस्टम अधिकारी सुद्धा अशा तस्करांना पकडण्यात वस्ताद असतात. ताजे प्रकरण दिल्ली विमानतळाचे आहे. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी येथे दोन जणांना अटक करण्यात आली. वास्तविक, दोघेही त्यांच्या तोंडात सुमारे १ किलो सोने आणत होते. पण जेव्हा कस्टमने त्यांचा शोध घेतला, तेव्हा कैद्यांची चलाखी तिथल्या तिथे उघडकीस आली.

  काय आहे संपूर्ण प्रकरण?

  एएनआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ग्रीन चॅनेलमध्ये दुबईहून येणाऱ्या उझबेकिस्तानचे २ नागरिक इंदिरा गांधी विमानतळावर पकडले गेले. शोधाशोध केली असता त्यांच्या तोंडातून ९५१ ग्रॅम सोने आणि धातूची साखळी जप्त करण्यात आली. त्यांनी दातांवर सोन्याचा मुलामा चढवला होता आणि त्यांच्या तोंडात साखळी ठेवली होती. हे सोने जप्त करण्यात आले. दिल्ली कस्टम झोनने सांगितले की ही घटना २८ ऑगस्टच्या रात्रीची आहे.

  कच्चा खेळाडू वाटतो…

  बच्चन साहेबांनी आधी हे केले आहे!

  प्राण जाए पर स्मगलिंग ना जाए…

  एका थप्पड मध्ये 500 ग्रॅम बाहेर …

  सोन्याची तस्करी करण्याची ही विचित्र पद्धत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे, ज्यावर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. एका युझरने लिहिले की, हे तस्कर देखील तस्करीचे आश्चर्यकारक मार्ग शोधत राहतात. इतरांनी लिहिले की, ते कच्चे खेळाडू आहेत. या विषयावर तुम्हाला आणखी काय म्हणायचे आहे?