केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची तब्येत खालावली, कोव्हीडनंतर होणाऱ्या आरोग्यासंदर्भातील तक्रारींमुळे एम्समध्ये दाखल

आज सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेतला जाणार होते. मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. एप्रिल महिन्यात निशंक यांना कोरोनाची लागण झाली होती.

    नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Union Education Minister Dr Ramesh Pokhriyal Nishank) यांना एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं आहे. कोव्हीडनंतर होणाऱ्या आरोग्यासंदर्भातील तक्रारींमुळे (Post COVID-19 Complications) त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.

    आज सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेतला जाणार होते. मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. एप्रिल महिन्यात निशंक यांना कोरोनाची लागण झाली होती.

    बारावीच्या परीक्षांबाबत 1 जून रोजी हा निर्णय घेतला जाईल आणि त्याकरता बैठकही होईल असं अपेक्षित होतं. तत्त्पूर्वी पोखरियाल यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.