केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती स्वतः: अमित शाह यांनी  ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सध्या अमित शाह उपचारासाठी  एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने मी चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत चांगली आहे परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी  रुग्णालयात दाखल होणार असल्याचे अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.” तसेच गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक त्यांच्या  संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी,” अशी विनंतीही अमित शाह यांनी ट्विटमध्ये केली आहे.