amit shah in hyderabad

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी कोणताही निर्णय घेण्यासाठी मागेपुढे पाहिलेले नाही.काळा पैसा खणून काढताना, आर्थिक सुधारणा करताना, करचुकवेगिरीचे सर्व मार्ग बंद करताना काही लोकांना त्रास हा होणारच. पण त्याचा विचार न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रहितासाठी योग्य तोच निर्णय घेतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते आहेत.

    नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठे विधान केले आहे. अशिक्षित लोक हे देशावरील मोठे ओझे आहे. ते कधीही चांगले नागरिक बनू शकत नाहीत, असे शहा यांनी म्हटले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, राज्यघटनेने आपल्याला काय अधिकार दिले आहेत किंवा कोणती कर्तव्ये बजावायला सांगितली आहेत, याची अशिक्षित माणसाला काहीही कल्पना नसते.

    अमित शहा यांनी सांगितले की, पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या कारकिर्दीत राज्यातल्या शाळांत विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून १ टक्क्यावर आले. शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केले आहे. ते प्रत्येकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात, मोदी शिस्तप्रिय आहेत. देशात परिवर्तन घडविण्यासाठी जनतेने सत्ता दिली आहे. फक्त सरकार चालविण्यापुरते हे अधिकार आपल्याला दिलेले नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे.

    मोदींचे देशहितासाठी योग्य निर्णय
    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी कोणताही निर्णय घेण्यासाठी मागेपुढे पाहिलेले नाही.काळा पैसा खणून काढताना, आर्थिक सुधारणा करताना, करचुकवेगिरीचे सर्व मार्ग बंद करताना काही लोकांना त्रास हा होणारच. पण त्याचा विचार न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रहितासाठी योग्य तोच निर्णय घेतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते आहेत. सध्या ज्या लोकशाही पद्धतीने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठका होतात, तशा त्या याआधी कधीही झाल्या नव्हत्या, हे मोदी यांचे टीकाकारही मान्य करतील. मोदी हे हुकूमशहा आहेत, या टीकेत काहीही तथ्य नाही.