महाराष्ट्राला दिलेल्या ५४ लाख लसींपैकी केवळ २३ लाख लसींचाच वापर, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा आरोप

प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाराष्ट्रात १२ मार्चपर्यंत ५२ लाख लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्राला दिलेल्या ५४ लाख लसींपैकी केवळ २३ लाख लसींचाच वापर झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात ५६ टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहेत. आता शिवसेनेचे खासदार अधिकच्या लसीची मागणी करत आहेत.

    मुंबई : देशासह राज्यातील काही ठिकाणी कोरोना रूग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हा पर्याय असून जास्तीत जास्त प्रमाणात लसीचे डोस राज्यात पुरवले जावे, या मागणीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (मंगळवार) केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली होती. परंतु महाराष्ट्राला दिलेल्या ५४ लाख लसींपैकी केवळ २३ लाख लसींचाच वापर होत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

    प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाराष्ट्रात १२ मार्चपर्यंत ५२ लाख लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्राला दिलेल्या ५४ लाख लसींपैकी केवळ २३ लाख लसींचाच वापर झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात ५६ टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहेत. आता शिवसेनेचे खासदार अधिकच्या लसीची मागणी करत आहेत. कोरोनाकाळात व्यवस्थेचा बोजवारा उडाला आणि लसीकरणासाठी योग्य व्यवस्थापन नसल्याचं दिसत आहे.

    दरम्यान, राज्यात एक कोटी ७७ लाख लोकांना यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रन्टलाईन वर्कस, ४५ वर्षांवरील विविध आजारांनी ग्रस्त नागरिक यांना २ कोटी २० लाख लसीचे डोसेस पुढील तीन महिन्यात लागणार आहेत.