#Unite2FightCorona -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केले ट्विटरवर जनआंदोलन

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi) यांनी आगामी सणासुदीचे तसेच थंडीचे दिवस ध्यानात ठेऊन कोरोनाविरुद्ध बचावासाठी गुरुवारी एका जन आंदोलनाची सुरूवात केली.(#Unite2FightCorona!) या जन आंदोलनाची सुरुवात करताना ‘औषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नाही’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi) यांनी आगामी सणासुदीचे तसेच थंडीचे दिवस ध्यानात ठेऊन कोरोनाविरुद्ध बचावासाठी गुरुवारी एका जन आंदोलनाची सुरूवात केली.(#Unite2FightCorona!) या जन आंदोलनाची सुरुवात करताना ‘औषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नाही’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

कोरोनाविरुद्ध लढाईत एकत्रित येण्याचे आवाहन करत त्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीं औषध बनत नाही तोपर्यंत लोकांना सावध राहण्यास सांगितले आहे. पंतप्रधान हिंदी आणि इंग्रजीत ट्विट केले. या, कोरोनाशी एकजूट होऊन लढूया! नेहमी लक्षात ठेवा : मास्क नक्की वापरा, हात साफ करत राहा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, ‘दो गज की दूरी’ (सहा फुटांचे अंतर) ठेवा’ असे म्हणताना पंतप्रधानांनी #Unite2FightCorona असा हॅशटॅग वापरला आहे.

मोदींनी कोरोना विषाणूशी संबंधित संदेशांसह फोटोही शेअर केले. यात त्यांनी मास्क ऐवजी गमछा घातला आहे आणि नमस्कार करत लोकांना बचावाचा आग्रह करताना दिसत आहेत. कोविड-१९ विरुद्ध भारताची लढाई जनतेद्वारे लढली जात आहे. आपल्या कोविड योद्ध्यांना या लढाईने मोठी ताकद मिळत आहे. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी अनेक लोकांचा जीव वाचला आहे. ही लढाई आपल्याला पुढेही सुरूच ठेवावी लागेल आणि आपल्या नागरिकांना व्हायरसपासून वाचवावे लागेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. कोरोनाबाबात सर्व उपाययोजनांचे पालन करत देश कसा पुढे नेता येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून जन आंदोलनाची सुरूवात करणार असल्याची माहिती प्रसारण मंत्रालयाद्वारे देण्यात आली होती.

अनेक मान्यवरांकडून स्वागत
पंतप्रधानांच्या ट्विटनंतर लगेच संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी या मोहिमेमध्ये सामील होऊन कोरोनाकाळात लोकांना मास्क घालण्यासाठी, योग्य अंतराचे पालन करण्यासाठी आणि सतत हात धुण्याचे आवाहन केले. रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करताना म्हटले आहे, स्वत: सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित राहण्यासाठी मदत करा आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही करोनाविरुद्ध जन आंदोलन पुढे नेण्याचे आवाहन जनतेला केले आहे.