काश्मिरात टार्गेट किलिंगसाठी यूपी-बिहारचे शूटर्स, आयएसआय सुपारी देण्याच्या तयारीत, गुप्तचर अहवालातील माहिती

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने (ISI) काश्मिरात राजकीय नेत्यांच्या हत्येसाठी आता यूपी-बिहारमधील शूटर्सना (UP-Bihar)सुपारी देण्याची तयारी सुरु केली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआयने या राज्यात असलेल्या आपल्या एजेंट्सना असे शार्प शूटर्स शोधावेत, असे आदेश दिले आहेत.

    श्रीनगर – जम्मू-काश्मीर ( Jammu-Kashmir) प्रदेश अस्थिर राहावेत यासाठी पाकिस्तानकडून (Pakistan)  दररोज नावनव्या क्लुप्त्या लढवण्यात येत आहेत, नवनवे कट रचण्यात येत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने (ISI) काश्मिरात राजकीय नेत्यांच्या हत्येसाठी आता यूपी-बिहारमधील शूटर्सना (UP-Bihar)सुपारी देण्याची तयारी सुरु केली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआयने या राज्यात असलेल्या आपल्या एजेंट्सना असे शार्प शूटर्स शोधावेत, असे आदेश दिले आहेत. ज्या शूटर्सची गुन्हेगारी कारकिर्द चांगली आहे आणि ज्यांचा उपयोग काश्मीर खोऱ्यात हत्या करण्यासाठी होऊ शकेल, असे शूटर्स शोधण्याचे प्रयत्न आता करण्यात येत आहेत. या शूटर्सना सुपारीची रक्कम म्हणून मोठी रक्कम आधीच आदा करण्यात येणार आहे.
    काश्मीर खोऱ्यात अशांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी दहशतवादी संघटना आणि आयएसआय सातत्याने प्रयत्न करीत आहेत, त्याचाच हाही एक भाग आहे. ठरलेल्या कटाप्रमाणे जर अशा राजकीय हत्या झाल्या, आणि उद्या हल्लेखोरांना पकडण्यात सैन्यदलाला यश आले, तर या शूटर्सना ओळखत नसल्याचा दावाही आयएसआय आणि दहशतवादी संघटना सहज करु सकणार आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार सफरचंदाचा व्यवसाय करणारे व्यापारीही आयएसआयच्या टार्गेटवर आहेत. शोपिया परिसरात सफरचंदांचा व्यापर करणारे हिंदू व्यापारी हे प्रमुख टार्गेट आहेत. त्यासह काश्मिरात बाहेरुन येवून राहिलेले व इथे व्यवसाय करणारे परप्रांतियही टार्गेटवर आहेत. गेल्या आठवड्यात हिंदू आणि शिख अल्पसंख्याक दहशतवाद्यांनी टार्गेट केले असून, अशा सुमारे २० कुटुंबियांतील काही जणांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुले काश्मीर खोऱ्यात राहत असलेल्या काश्मिरी पंडीत, शिख आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
    तर दुसरीकडे खोऱ्यातून कर्मचाऱ्यांनी आणि हिंदू, शिख यांनी बाहेर पडू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. प्रवासी कर्मचाऱ्यांनी खोरे सोडू नये असे आदेश देण्यात आले आहेत. जर अनुपस्थित राहिले तर नियमांनुसार त्यावर कारवी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रवासी कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.