Coronavirus: गर्भनिरोधक साधनांचा वापर घटला, येत्या काही दिवसांत जन्मदर वाढण्याची शक्यता

कोरोना वायरस आणि लॉकडाउन काळात गर्भनिरोधक साधनांचा वापर घटला आहे. उत्तरप्रदेश आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर पासून ते ३१ मार्चच्या तुलनेत एक एप्रिल पासून ते २० जून पर्यंत फक्त 5.85% गर्भनिरोधक गोळ्याआणि 9.02% कंडोमची विक्री झाल्याचे समोर आले आहे.

उत्तरप्रदेश : कोरोना वायरस (Coronavirus) आणि लॉकडाउन (Lockdown) काळात गर्भनिरोधक साधनांचा वापर घटला आहे. उत्तरप्रदेश आरोग्य विभाग (Uttar pradesh Health department) च्या आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर पासून ते ३१ मार्चच्या तुलनेत एक एप्रिल पासून ते २० जून पर्यंत फक्त 5.85% गर्भनिरोधक गोळ्या (Contraceptive pills) आणि 9.02% कंडोम (Condom) ची विक्री झाल्याचे समोर आले आहे.

कोरोना काळात कुटुंब नियोजनाचा वेगही मंदावला आहे. लॉकडाउनच्या काळात दळणवळणाची साधने ठप्प झाल्याने आशा आणि एएनएमना घरोघरी जाऊन गर्भनिरोधक साधनांचे वाटप करता आले नाही. उत्तर प्रदेश आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर पासून ३१ मार्चच्या तुलनेत एप्रिल पासून २० जूनपर्यंत अवघ्या 5.85% गर्भनिरोधक गोळ्या आणि 9.02% कंडोम वाटप झाल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय केवळ आपत्कालीन प्रकरणांमध्येच रुग्णालयांना प्राधान्य देण्यात आले होते. अशा परिस्थितीत काही दिवसांत असुरक्षित गर्भपात करूनही जन्म दर वाढू शकतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

लोहिया संस्थेच्या महिला आणि प्रसुती विभागप्रमुख डॉ. यशोधरा प्रदीप यांच्या मते, लॉकडाउन काळात लोक घरातच आहेत. या दरम्यान लैंगिक क्रियांमध्ये वाढ झाली आहे. लोक पूर्वीपासूनच गर्भ निरोधक साधनांचा वापर करत नव्हते. यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढली आहे.यामुळे येत्या काही दिवसांत जन्मदरात वाढ होण्याची शक्यता आहे. तर रुग्णालयात गर्भपाताची प्रकरणे सातत्याने येत आहेत पण नसबंदीची प्रकरणे येत नाहीत असे क्वीन मेरी रुग्णालयाच्या डॉ. रेखा सचान यांनी सांगितले.

अंतरा, कॉपर-टीचा वापर आणि नसबंदी थांबली

रुग्णालयात कुटुंब नियोजन सल्लागार डॉ. अरुणा नारायण यांच्या मते, रुग्णालयांत कुटुंब नियोजनाचा उपचार घेणाऱ्या रुग्णांचे समुपदेशनही सुरू आहे. तर आरोग्य विभागाच्या वतीने आशा आणि एएनएम कंडोम, ओरल पिल्स, छाया गोळ्या, ईसीपी पिल्सचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सामान्य व्यवस्थापक डॉ. अल्पना शर्मा यांनी दिली. या उलट रुग्णालयांत कोरोना संक्रमणामुळे रुग्णालयांत शस्त्रक्रिया, नसबंदी, अंतरा इंजेक्शन आणि कॉपर-टी बसविण्याचे काम थांबले आहे.

२३ लाख महिलांना इच्छा नसतानाही झाली गर्भधारणा

फाउंडेशन फॉर रिप्रेडक्टिव हेल्थ सर्विसच्या अनुमानानुसार, गर्भनिरोधक साधने उपलब्ध न होणे आणि कोरोना संक्रमणामुळे देशात २ ते ३ दशलक्ष महिलांचा गर्भधारणेची इच्छा नसताना गर्भपात होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणू ७,००,००० असुरक्षित गर्भपात आणि गर्भधारणेसंबंधी मृत्यूला कारण ठरू शकतो तर, जवळपास २३ लाख महिलांना इच्छा नसतानाही गर्भधारणा झाली आहे.