पंतप्रधान मोदी म्हणाले की, काशी विश्वनाथ धाम योजना ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करून देशातील देदीप्यमान प्रतिकात्मक स्वरुपात लोकार्पण करण्यात येईल. साजघाटावर पंतप्रधान म्हणाले की, १०० वर्षांहून अधिक वर्ष चोरीला गेलेली माता अन्नपूर्णेची मूर्ती काशीहून चोरी झाली होती, ती पुन्हा काशीत दाखल होणार आहे. माता अन्नपूर्णा पुन्हा एकदा आपल्या घरी परतणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काशी विश्वनाथ धाम योजना ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करून देशातील देदीप्यमान प्रतिकात्मक स्वरुपात लोकार्पण करण्यात येईल. साजघाटावर पंतप्रधान म्हणाले की, १०० वर्षांहून अधिक वर्ष चोरीला गेलेली माता अन्नपूर्णेची मूर्ती काशीहून चोरी झाली होती, ती पुन्हा काशीत दाखल होणार आहे. माता अन्नपूर्णा पुन्हा एकदा आपल्या घरी परतणार आहे.

रामाची नगरी अयोध्येमध्ये भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अयोध्या जनपदमध्ये जिल्हा पंचायत सदस्यांच्या ४० जागा आहेत. यापैकी २४ जागांवर समाजवादी पक्षाने झेंडा फडकावला आहे. भाजपाला फक्त ६ जागा मिळाल्या आहेत. तर १२ अपक्षांच्या पारड्यात गेल्या आहेत. भाजपाला बंडखोरीमुळे मोठा पराभव पहावा लागला आहे. १३ जागांवर बंडखोरी झाली होती. राममंदीर बनत असताना अयोध्येत भाजपाला मोठा झटका बसला आहे.

    अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भाजपाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या अजेंड्यामध्ये नेहमी असतात.तरी येथे भाजपाचा करिष्मा चालला नाही. पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकांनी झोप उडविली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशाच्या या तीन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून योगी सरकारने खूप मेहरबानीदेखील केली आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत झालेली पडझड भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठे संकेत मानले जात आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात भाजपाची स्थिती चिंताजनक बनली आहे. एमएलसी निवडणुकीनंतर जिल्हा पंचायत निवडणुकीतही भाजपाला काशीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा पंचायतीच्या ४० पैकी ८ जागा जिंकता आल्या आहेत. बसपाला पाच जागा मिळाल्या आहेत. बनारसमध्ये अपना दलाला ३ जागा, आपला १ आणि सुहेलदेव यांच्या भारतीय समाज पार्टीला 1 जागा मिळाली आहे.तीन अपक्ष जिंकले आहेत.२०१५ मध्ये देखील भाजपाला इथे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, योगी सरकारने सत्तेत येताच जिल्हा पंचायतीची खूर्ची सपाकडून हिसकावली होती.

    राम- कृष्ण नगरीत पराभव

    रामाची नगरी अयोध्येमध्ये भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अयोध्या जनपदमध्ये जिल्हा पंचायत सदस्यांच्या ४० जागा आहेत. यापैकी २४ जागांवर समाजवादी पक्षाने झेंडा फडकावला आहे. भाजपाला फक्त ६ जागा मिळाल्या आहेत. तर १२ अपक्षांच्या पारड्यात गेल्या आहेत. भाजपाला बंडखोरीमुळे मोठा पराभव पहावा लागला आहे. १३ जागांवर बंडखोरी झाली होती. राममंदीर बनत असताना अयोध्येत भाजपाला मोठा झटका बसला आहे. भगवान श्रीकृष्णांची नगरी समजल्या जाणाऱ्या मथुरेतही भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. मथुरेमध्ये बसपाने बाजी मारली आहे. बसपाने १२, आरएलडीने ९ जागंवर विजय मिळविला आहे. तर भाजपाला 8 जागा मिळाल्या आहेत. सपाला १ च जागा जिंकता आली आहे. ३ अपक्ष जिंकले आहेत. मथुरेत काँग्रेसच्या झोळीत भोपळा आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षच निवडणूकीत पडले आहेत. मथुरेत शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे भाजपाला पराभव पत्करावा लागल्याचे सांगितले जात आहे.