ऑक्टोबरपूर्वीच विका १५ वर्षे जुने वाहन अन्यथा… नोंदणी नूतनीकरणावर ८ पट शुल्क

रस्ते परिवहन मंत्रालयाने गाड्या भंगारात काढण्याच्या योजनेसाठी एक नवी मसुदा अधिसूचना जारी केली आहे ज्यात या किंमतींबद्दल सांगण्यात आले आहे. यानुसार जर आपण आपल्या खासगी गाडीच्या नोंदणीत विलंब करत आहात तर आपल्याला दर महिन्याला ३०० ते ५०० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो तर व्यावसायिक गाड्यांच्या बाबतीत हा दंड ५० रुपये असेल.

    दिल्ली : आपल्याकडे जर एखादी १५ वर्षे किंवा त्यापेक्षा जुनी कार किंवा बाईक असेल तर ती ऑक्टोबरपूर्वी विकून टाका, अन्यथा यानंतर आपल्याला या गाड्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण करायचे झाल्यास आपल्याला ८ पट अधिक शुल्क लागणार आहे. २०२१च्या ऑक्टोबरपासून मालकांना आपली १५ वर्षे जुन्या कारची नवी नोंदणी करण्यासाठी सध्या लागू असलेल्या शुल्कापेक्षा ८ पट शुल्क द्यावे लागेल. याशिवाय जर आपल्याकडे १५ वर्षांपेक्षा जुना ट्रक किंवा बस असेल तर त्याचे फिटनेस आणि नोंदणीच्या नवीकरणासाठी सध्याच्या शुल्कापेक्षा २१ पट शुल्क द्यावे लागेल.

    स्क्रॅप धोरणासाठी नवी मसुदा अधिसूचना

    रस्ते परिवहन मंत्रालयाने गाड्या भंगारात काढण्याच्या योजनेसाठी एक नवी मसुदा अधिसूचना जारी केली आहे ज्यात या किंमतींबद्दल सांगण्यात आले आहे. यानुसार जर आपण आपल्या खासगी गाडीच्या नोंदणीत विलंब करत आहात तर आपल्याला दर महिन्याला ३०० ते ५०० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो तर व्यावसायिक गाड्यांच्या बाबतीत हा दंड ५० रुपये असेल.

    विद्युत आणि इतर इंधनांवरच्या गाड्यांबद्दल संभ्रम
    दरम्यान, सरकारच्या या प्रस्तावात ही गोष्ट स्पष्ट नाही की विद्युतशक्तीवर किंवा इतर इंधनांवर चालणाऱ्या गाड्यांवरही या धोरणामुळे बंदी येणार की नाही. सध्या नोंदणी आणि फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाच्या शुल्कांमध्ये मोठी वाढ झाल्याने गाडीमालक हतबल होऊ शकतात. भंगारच्या धोरणाबाबत सरकारने एक मसुदा तयार केला आहे. या प्रस्तावात म्हटले आहे की गाड्यांचे मालक आपली जुनी गाडी देशातील कोणत्याही भंगार केंद्रावर नेऊ शकतात.