पंतप्रधान मोदींसह ‘या’ दिग्गज नेत्यांचे अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारकस्थळ 'सदैव अटल' येथे भेट देऊन श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची कायम आठवण राहील. अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.

दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे पुण्यतिथी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारकस्थळ ‘सदैव अटल’  येथे भेट देऊन श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची कायम आठवण राहील. अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे. 

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आज सकाळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल या स्मारक स्थळाला भेट दिली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्ंयाच्या सोबतच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यानी देखील स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहिली. 

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करत म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार अटलबिहारींच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून आणि भारताला जातिक दर्जा देऊन पूर्णपणे सुशासन आणि गरीब कल्याणाच्या मार्गावर आहे. भारताला महासत्ता बनविण्याचा दृढनिश्चय केला आहे. तसेच अटल बिहारींच्या कार्यकाळात प्रथमच देशात सुशासन घडताना दिसले आहे. त्यांनी सर्व शिक्षा अभियान, पंतप्रधान ग्राम सडक योजना, राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प अशी विकासात्मक कामे केली आहेत. तर त्याच्या कार्यकाळात त्यांनी पोखरण चाचणी आणि कारगिल विजय याच्या सहाय्याने सशक्त भारताची पायाभरणी केली. 

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्वीट करत लिहिले आहे की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करतो. भारत आणि सामान्य लोकांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच लक्षात राहिल. तसेच भारताबद्दलच्या त्यांच्या कल्पना भावी पीढीला प्रेरणा देत राहतील.