उपराष्ट्रपतींना कोरोनाची लागण

उपराष्ट्रपती  आणि राज्यसभेचे सभापती  व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसून त्यांची प्रकृती ठीक आहे. आज सकाळी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना कोरोनाची लक्षणं नसल्याने  गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.तसेच व्यंकय्या नायडू यांची पत्नी उषा यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांना स्व विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती सचिवायलाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्यंकय्या नायडू यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली.आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची रुटीन कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच संसदेचं अधिवेशन झालं. या अधिवेशनात २४ हून अधिक खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संसदेचं अधिवेशन वेळे आधीच गुंडाळण्यात आलं.या अधिवेशनात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे सभापती म्ह्णून काम पाहिले.