आता बोला? नवरीला भावाने मारायचं आणि नवरदेवाने करायची मेहुण्याची धुलाई

पाहुण्यांनी घातलेल्या पोशाखावरुन हे लग्न राजस्थान (Rajasthan) किंवा हरियाणामधील असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून समजतं, की लग्नातील इतर कार्यक्रम झालेले आहेत आणि आता लग्नानंतरचे कार्यक्रम सुरू आहेत. इतक्यात नवरी आणि तिच्या भावामध्ये भांडण सुरू होतं. हे भांडणही साधं नाही तर थेट एकमेकांना मारहाण करणं सुरू होतं.

    नवी दिल्ली : भारतातील लग्नसमारंभांमधील व्हिडिओ (Wedding Videos) हे पाहण्यासारखे असतात. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा पाहायला मिळतात. लग्नातील अजब घटनांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये लग्नात नवरी (Bride) बनलेली बहीण आणि भावचं भांडण लावण्याची परंपरा आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    व्हिडिओमध्ये पाहुण्यांनी घातलेल्या पोशाखावरुन हे लग्न राजस्थान (Rajasthan) किंवा हरियाणामधील असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून समजतं, की लग्नातील इतर कार्यक्रम झालेले आहेत आणि आता लग्नानंतरचे कार्यक्रम सुरू आहेत. इतक्यात नवरी आणि तिच्या भावामध्ये भांडण सुरू होतं. हे भांडणही साधं नाही तर थेट एकमेकांना मारहाण करणं सुरू होतं.

    नवरी आपल्या भावाला हळूहळू मारत आहे, मात्र भावाला जणू तिला मारण्याची आयती संधीच मिळाली आहे. तो आपल्या बहिणीला जोरजोरानं मारू लागतो आणि थांबण्याचं नावही घेत नाही. व्हिडिओवर आलेल्या कमेंट पाहून समजतं की ही तिथली एक परंपरा आहे. यानंतर एक महिला नवरी आणि तिच्या भावाच्या मध्ये येऊन हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करते. मात्र, नवरीचा भाऊ तरीही मागे हटत नाही. यानंतर अखेर नवरदेवच या भांडणाच्या मध्ये येतो आणि नवरीच्या भावाला बाजूला घेतो. यानंतर तो मेहुण्याला दोन कानशिलातही लगावतो.

    video viral groom beaten his brother during marriage function