विकास दुबेच्या भावाचे घर कुर्क

लखनौ : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या बिकरू हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. यानंतर हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर विकास दुबेला उत्तर प्रदेश एटीएसने चकमकीत ठार केले होते.

लखनौ : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या बिकरू हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. यानंतर हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर विकास दुबेला उत्तर प्रदेश एटीएसने चकमकीत ठार केले होते. मात्र, अजूनही या प्रकरणाशी संबंधित लोकांवर कारवाई केली जात आहे. आता विकास दुबेचा फरार असलेला भाऊ दीपप्रकाश दुबेचे घर लखनौ पोलिसांनी कुर्क केले आहे. उल्लेखनीय आहे की, लखनौच्या कृष्णानगरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा दीपप्रकाश दुबेचे घर कुर्क करण्यासाठी पोहोचला होता. ५०,००० चा पुरस्कार असलेला दीपप्रकाश दुबे उ‌र्फ दीपू बिकरू हत्याकांडानंतर फरार आहे.