दिल्लीतील डीजेबी मुख्यालयात हिंसक टोळक्यांचा तुफान राडा, भाजपचा हात असल्याचा आपचा आरोप

एका हिंसक टोळक्याने अचानक दिल्लीतील जल प्राधिकरणाऱ्या मुख्यालयात प्रवेश करत तोडफोड केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत ते भाजपचेच गुंड होते. असा गंभीर आरोप केला आहे.

दिल्लीतील डीजेबी मुख्यालयात (DJB headquarters in Delhi) हिंसक टोळक्यांनी तुफान राडा करून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपच्या गुंडांचा हात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

एका हिंसक टोळक्याने अचानक दिल्लीतील जल प्राधिकरणाऱ्या मुख्यालयात प्रवेश करत तोडफोड केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत ते भाजपचेच गुंड होते. असा गंभीर आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १०० हून अधिक लोकांनी मुख्यालयात प्रवेश केला आणि तुफान राडा घातला. काचा, खुर्च्या, झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्या आधारे दिल्ली पोलीस धुडगूस घालणाऱ्या लोकांचा शोध घेत आहेत.