आज चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी मतदान ; रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचे मोदींचे चार भाषांमध्ये आवाहन

तामिळनाडूत २३४ विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून सहा कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी ३९९८ उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच अभिनेता रजनीकांत यांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय कमल हासन आपल्या मुलींसोबत पोहोचले होते.

    आज केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम या चार राज्यात आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात एकूण ४७५ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर दुसरीकडे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आसाममध्ये आजचा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मतदारांना रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे यासाठी त्यांनी चार भाषांमध्ये ट्विट केलं आहे.

    तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये ४०, पश्चिम बंगालमध्ये ३१ आणि पुद्दुचेरीत ३० जागांसाठी आज मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकांसोबतच मल्लपूरम आणि कन्याकुमार या दोन जागांसाठीदेखील मतदान होत आहे.तामिळनाडूत आज अण्णाद्रुमूक आणि एलडीएफ सरकारचं भवितव्य ठरणार आहे

    अभिनेता कमल हासन, रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क