isis spreading in maharasahtra

इसिस दहशतवादी संघटनेचे भारतीय मॉडेल असलेल्या अल-हिंदने कोडगू आणि कोलारसह कर्नाटकातील काही जिल्ह्यांसह दक्षिण भारतात आपले साम्राज्य निर्माण करण्यासाठी विस्तृत योजना आखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बंगळुरू : गुंडलूपेट, शिवनसमुद्र येथे जागतिक दहशतवादी संघटना इसिसचे (ISIS) भारतीय रुप असलेल्या अल-हिंदच्या छावण्या ( camps) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इसिसची दक्षिण भारतात बस्तान (ISIS Camps)बसविण्याची योजना आहे. या अतिरेक्‍यांनी गुंडलूपेट आणि शिवनसमुद्र जंगलात प्रशिक्षण घेण्याची तयारी केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रात ही माहिती दिली आहे. त्यांनी कोडगू आणि कोलारसह अनेक जिल्ह्यात हिंदू नेत्यांच्या हत्त्येनंतर जंगलात लपण्याची योजना आखली आहे.

इसिस दहशतवादी संघटनेचे भारतीय मॉडेल असलेल्या अल-हिंदने कोडगू आणि कोलारसह कर्नाटकातील काही जिल्ह्यांसह दक्षिण भारतात आपले साम्राज्य निर्माण करण्यासाठी विस्तृत योजना आखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संघटनेत भरती केलेल्या नवीन अतिरेक्‍यांना मंड्या जिल्ह्यातील शिवनसमुद्र आणि चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलूपेट येथे वनात कसे राहायचे, याबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी आवश्‍यक साधने तयार केली असल्याची बाब देखील उघडकीस आली आहे.

१७ जणांविरोधात आरोपपत्र

गेल्या वर्षी बंगळूरचा मेहबूब पाशा आणि तामिळनाडूच्या कुडलोर येथील ख्वाजा मोदीन यांना राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) अटक केली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान बरीच माहिती उघड झाली होती. १७ जुलैला एनआयएने १७ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. अल-हिंद दहशतवाद्यांनी देश आणि राज्यातील हिंदू नेते, धार्मिक नेते, राजकीय नेते, पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची हत्या करण्याची योजना आखली होती, असे एनआयएने माहिती दिली आहे. अल-हिंद दहशतवाद्यांनी कर्नाटकातील कोडगू, कोलार, केरळ, महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर, पश्‍चिम बंगालमधील बुद्रवन येथे आपले तळ स्थापन करण्याची योजना आखली आहे, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रातही पसरले हातपाय

कर्नाटकातील कोडगू, कोलार त्याबरोबच शेजारच्या राज्यातही हातपाय पसरण्यास ( ISIS is spreading in Maharashtra) सुरुवात केली आहे. केरळ त्याबरोबरच महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि पश्‍चिम बंगालमधील बुद्रवन येथे दहशतवाद्यांनी बस्तान बसविण्याची जय्यत तयारी केली आहे.