गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या योद्ध्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी लढताना भारतीय सैनिकांना वीरमरण आलं होतं. बिहारचे १६ कमांडिग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू आणि काही भारतीय सैनिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिनी शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे.

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात देशासाठी संघर्ष करताना भारतीय जवानांना वीरमरण आलं. एकता व अखंडतेसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या भारतीय सैनिकांना २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शौर्य पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे.

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी लढताना भारतीय सैनिकांना वीरमरण आलं होतं. बिहारचे १६ कमांडिग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू आणि काही भारतीय सैनिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिनी शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे.

सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीर योद्ध्यांसाठी शौर्य पुरस्कार सन्मानित करण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत केवळ लष्करी जवानांना दिले जाणारे ‘परमवीर चक्र’, ‘शौर्य चक्र’, ‘अशोक चक्र’, ‘महावीर चक्र’ व ‘कीर्ति चक्र’ हे प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत.

गलवान खोऱ्यात १५ जूनला चिनी सैनिकांशी संघर्ष करताना शहीद झालेल्या २० भारतीय सैनिकांमध्ये १६ बिहार रेजीमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल संतोष बाबू सुद्धा सहभागी होते.