indian army

अवंतीपोरा येथील पंजगम भागाजवळच्या एका बागेत आयईडी सापडलं. स्फोटकं आढळून येताच भारतीय सैन्यानं बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केलं. त्यानंतर स्फोटकं निकामी करण्यासाठी या ठिकाणी तात्काळ दाखल झालं.

    श्रीनगर: भारतीय लष्कराच्या सर्तकतेमुळे काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. दक्षिणा काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी ठेवलेली स्फोटकं लष्कराच्या नजरेला पडल्याने हल्ल्याचा कट टळला आहे.

    अवंतीपोरा येथील पंजगम भागाजवळच्या एका बागेत आयईडी सापडलं. स्फोटकं आढळून येताच भारतीय सैन्यानं बॉम्ब शोधक पथकाला (Bomb Disposal Squad) ला पाचारण केलं. त्यानंतर स्फोटकं निकामी करण्यासाठी या ठिकाणी तात्काळ Bomb Disposal Squad दाखल झालं. काही वेळातच या पथकानं स्फोटकं निकामी केलीत.

    Bomb Disposal Squad नं हे स्फोटक निकामी केलं आहे. एनआयए या वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्त दिलं असून यासंबंधीचा व्हिडिओही ट्वीटरवर शेअर केला आहे. दोन आठवड्यापूर्वीही दक्षिण पुलवामा जिल्ह्यात १०किलोची स्फोटकं जप्त करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्वीटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी आयईडी हल्ले करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती तेव्हा पोलिसांनी दिली आहे.