आपण लवकरच अमेरिकेला चाचण्यांमध्ये मागे टाकू : डॉ. हर्ष वर्धन

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ३०० दशलक्ष कोरोनाचे रुग्ण आणि ५-६ दशलक्ष मृत्यू होतील असं सांगण्यात आलं होतं. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आपण दररोज ११ लाख चाचण्या करत आहोत. आपल्यापेक्षा अधिक चाचण्या केवळ अमेरिकेनं केल्या आहे. आपण लवकरच अमेरिकेला चाचण्यांमध्ये मागे टाकू, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.

देशात कोरोना रूग्णांच्या (Corona virus)  संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लस विकसित करण्याचं कामं सुरू आहे. तसेच १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आपण दररोज ११ लाख चाचण्या (Tests) करत आहोत. आपल्यापेक्षा अधिक चाचण्या केवळ अमेरिकेनं (America)केल्या आहे. आपण लवकरच अमेरिकेला चाचण्यांमध्ये मागे टाकू, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन ( Dr. Harsh Vardhan) यांनी राज्यसभेत दिली आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ३०० दशलक्ष कोरोनाचे रुग्ण आणि ५-६ दशलक्ष मृत्यू होतील असं सांगण्यात आलं होतं. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आपण दररोज ११ लाख चाचण्या करत आहोत. आपल्यापेक्षा अधिक चाचण्या केवळ अमेरिकेनं केल्या आहे. आपण लवकरच अमेरिकेला चाचण्यांमध्ये मागे टाकू, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सरकारनं आवश्यक ती पावलं उचलली आहेत. तसंच इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर कमी आहे. सरकारला कोविडचे नवे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंना आळा घालण्यात यश मिळाल्याचंही हर्ष वर्धन म्हणाले. अन्य देशांप्रमाणे भारतही लस विकसित करण्याचे प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांचा एक गट यावर लक्ष ठेवून आहे आणि आमच्याकडे पुढील योजनाही तयार आहेत. असे हर्ष वर्धन म्हणाले.