wedding insurance

मुंबई. श्रीमंत असो व गरीब लग्न हा प्रत्येकासाठीच खर्चिक सोहळा असतो. अनेक जण आयुष्यभराची कमाई यामध्ये खर्च करतात. मंगल कार्यालय, डेकोरेशन, कॅटरिंग अशा अनेक गोष्टींवर लग्नामध्ये सढळ हाताने पैसा खर्च होतो. अशावेळेस दुर्दैवाने लग्न मोडले तर मानसिक आघातासोबतच आर्थिक फटकाही सहन करावा लागतो, परंतु आता या खर्चिक सोहळ्याला विमा कवच देणे शक्य झाले आहे. लग्नाआधी नवरी किंवा नवरा पळून गेल्यास याशिवाय कुठल्याही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे लग्न मोडल्यास विमा कंपनी याला इंशुरन्स कव्हर देते.

विमा कवचचे महत्व जाणणारे आणि त्याची खरेदी करणारा मोठा जागरूक ग्राहक वर्ग आपल्याकडे आहे. विम्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. दरम्यान काही विमा कंपन्या एका अनोख्या परिस्थितीसाठी देखील विमा ऑफर करत आहेत. काही विमा कंपन्या ( insurance company) लग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास विमा देत आहे. या प्रकारच्या विम्याला वेडिंग इंशुरन्स (wedding insurance policy) म्हणतात. वाचायला जरी हे गमतीशीर वाटत असले तरी, याला बऱ्यापैकी मागणीही असल्याचे समोर येत आहे.

काय आहे वेडिंग इंशुरन्स पॉलिसी?

लग्नासाठी देखील अनेक कंपन्यांनी इंशुरन्स पॉलिसी बनवली आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही वेडिंग इंशुरन्स पॉलिसीचे पॅकेज घेऊ शकता. तुमच्या सोयीनुसार या पॅकेजची निवड करता येते. या पॅकेजअंतर्गत मिळणारे अनेक लाभ तुम्हाला घेता येतात.
https://www.paisabazaar.com/commercial-insurance/wedding-insurance/ पैसा बाजार डॉट कॉम या ब्रोकिंग साईटवर वेडिंग इंशुरन्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

वेडिंग इंशुरन्सची आवश्यकता काय?

लग्नासाठी मोठा खर्च केला जातो. यामध्ये अनेक गोष्टी असतात. हॉल किवा रिसॉर्टच्या अ‍ॅडव्हान्सचा खर्च असतो. यावर इंशुरन्स मिळतो. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल एजन्सीला दिलेल्या अ‍ॅडव्हान्स पेमेंटवर, हॉटेलच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंवर, लग्नपत्रिकांचा खर्च, सजावट यावरील खर्चावर इंशुरन्स असतो.

त्यामुळे लग्न कोणत्याही कारणाने रद्द झाल्यास, तुमचे दागिने चोरी झाल्यास, अपघात झाल्यास अशा अनेक समस्यांअंतर्गत हा वेडिंग इंशुरन्स तुमच्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून काम करेल. एका योग्य विमा पॉलिसीअंतर्गत तुम्ही तुमच्या नुकसानाची भरपाई करू शकता.