एक मजेशीर बाब म्हणजे हे दोघंही आपल्या खुर्च्यांवर बसलेले आहेत, मात्र या खुर्च्या जमिनीवर नाही. तर, नातेवाईकांनी आणि मित्रांनी या खुर्च्या वरती उचलून घेतल्या आहेत, जेणेकरून नवरी आणि नवरदेव सहजरित्या एकमेकांना वरमाळ घालू शकणार नाहीत.
नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडिया (Social Media) आणि टेक्नोलॉजी यामुळे नवरदेव आणि नवरी लग्नाच्या आधीच खूप चांगले मित्र होतात. त्यांचं हे खास बॉन्डिंग लग्नातही दिसून येतं. लग्नसमारंभादरम्यान नवरदेव आणि नवरी अनेकदा एकमेकांसोबत मस्ती करतानाही दिसतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ वरमाळ (Varmala Video) घालताना शूट केला गेला आहे.
सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर नवरदेव आणि नवरीचा हा व्हिडिओ (Bride and Groom Video) व्हायरल होत आहे. हे दोघंही रस्त्यावरच एकमेकांना वरमाळ घालताना दिसत आहेत. आणखी एक मजेशीर बाब म्हणजे हे दोघंही आपल्या खुर्च्यांवर बसलेले आहेत, मात्र या खुर्च्या जमिनीवर नाही. तर, नातेवाईकांनी आणि मित्रांनी या खुर्च्या वरती उचलून घेतल्या आहेत, जेणेकरून नवरी आणि नवरदेव सहजरित्या एकमेकांना वरमाळ घालू शकणार नाहीत.
View this post on Instagram
निरंजन महापात्रानं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरीदेव हसत आणि मस्ती करत एकमेकांना वरमाळा घालत असल्याचं दिसतं. त्यांची ही मस्ती पाहून तिथे उपस्थित लोकंही हसू लागतात. आसपासच्या घरांमधील लोकही बालकनीमधून वरमाळेचा हा कार्यक्रम पाहताना दिसतात.
wedding varmala funny video of bride and groom goes viral