हा आहे कलियुगातला ‘कुंभकर्ण’, वर्षातून ३०० दिवस झोपतो; कारण जाणून थक्क व्हाल

४२ वर्षांचे पुरखाराम दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत. या कारणामुळेच ते सामान्य माणसांपेक्षा अधिक वेळ झोपतात. एवढंच नाही या आजारामुळेच एकदा झोपल्यानंतर पुरखाराम अनेक दिवस उठतच नाहीत. पुरखारामच्या या दुर्मिळ आजारामुळे त्याच्या घरचेही चिंतेत आहेत.

  राजस्थान : पुरेशी झोप घेणं हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण प्रमाणापेक्षा अधिक झोप घेणं हेही आरोग्यासाठी घातकच आहे. ज्या व्यक्तीविषयी आम्ही सांगत आहोत त्याच्याविषयी ऐकून तुम्हीही हैराण झाला नाही तर नवलंच, हो खरंय राजस्थानातील नागौर जिल्ह्यातून एक असंच प्रकरण समोर आलं आहे. येथे राहणारा एक व्यक्ती वर्षातून ३०० दिवस चक्क झोपतो. ही व्यक्ती एकदा झोपल्यानंतर तिला उठवणं मुश्किल होऊन बसतं. झोपेतच घरातले त्याला जेवण भरवतात. एवढंच नाही तर या व्यक्तीला आजूबाजूची लोकं त्याला ‘कुंभकरण’च म्हणतात.

  या व्यक्तीला झालाय दुर्मिळ आजार

  वास्तविक हे प्रकरण नागौर जिल्ह्यातील भादवा गावचे आहे. येथे राहणारे ४२ वर्षांचे पुरखाराम दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत. या कारणामुळेच ते सामान्य माणसांपेक्षा अधिक वेळ झोपतात. एवढंच नाही या आजारामुळेच एकदा झोपल्यानंतर पुरखाराम अनेक दिवस उठतच नाहीत. पुरखारामच्या या दुर्मिळ आजारामुळे त्याच्या घरचेही चिंतेत आहेत. त्याच्या घरच्यांना यांना जागं करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.

  २३ वर्षांपासून जडलाय आजार

  पुरखारामच्या कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, एकदा झोपल्यानंतर २० ते २५ दिवस ते जागे होत नाहीत. न्यूज १८च्या एका अहवालानुसार, याची सुरुवात २३ वर्षांपूर्वी झाली होती. सुरुवातीच्या काळात पुरखाराम ५ ते ७ दिवसांसाठी झोपत असे पण त्यांना जागं करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागत असे. त्यांना डॉक्टरलाही दाखवलं पण आजार अद्यापही आटोक्यात आलेला नाही.

  कमाईवरून आई आहे नाराज

  हळूहळू पुरखारामच्या झोपेचा कालावधी वाढत गेला. आता तर पुरखाराम अनेकदा २५ दिवसांपर्यंत झोपून राहतात. तज्ज्ञांनी हा आजार दुर्मिळ असल्याचं सांगितलं. पुरखाराम यांची पत्नी लिछमी देवी म्हणतात की, गावात त्याचं एक जुनं दुकानही आहे. परंतु ते अधिक काळ बंदच असतं. आता शेतीवर गुजराण होते आहे, पण एक नातू आणि २ नातींचे शिक्षण आणि त्यांच्या भविष्यांची चिंता त्यांना भेडसावते आहे.

  यांचं म्हणणं आहे की जागं राहण्यासाठी शरीर साथ देत नाही

  तर पुरखाराम यांच्या मते त्यांना दुसरी काहीही अडचण नाही. फक्त झोप येते. त्यांना स्वत:ला जागं राहावंस वाटतं पण त्यांचं शरीर याला साथ देत नाही. २०१५ मध्ये त्यांच्या या आजाराचं प्रमाण वाढलं. पूर्वी जवळपास १८-१८ तास झोप येत होती. त्यानंतर झोपेची वेळ वाढत गेली. आता अनेकदा असं होतं की, २०-२५ दिवसांपर्यंत ते झोपून असतात.

  दुर्मिळ आजाराचं नाव आहे हायपरसोम्निया

  अहवालानुसार, या आजाराचं नाव हायपरसोम्निया आहे. या आजारातही अनेक प्रकार आहेत. पुरखारामच्या या हायपरसोम्निया प्रमाण अधिकाधिक वाढत चाललं आहे. यामुळे त्यांना सातत्याने अनेक दिवसांपर्यंत झोप येते आहे. तज्ज्ञांच्या मते, ते आता बरे होऊ शकणार नाहीत असं नाही, त्यांना योग्य उपचार मिळाल्यास ते बरे होऊ शकतात.

  weird this is kumbhakarna of kaliyuga a person sleeps for 300 days a year the reason is rare disease know the details