कोरोना संकट रोखण्यासाठी तुमच्याकडे नॅशनल प्लान काय आहे? ; सुप्रीम कोर्टाचा सवाल

कोरोनाच्या संकटावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. त्यावेळी कोर्टाने केंद्रावर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी केंद्र सरकारडून कोर्टाला उत्तर देण्मयात आलं आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत राज्यांना केंद्राने पत्रं पाठवलं आहे, असं केंद्राने कोर्टाला सांगितलं. त्यावर या सुनावणीचा अर्थ उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी थांबवणं नाही.

    नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या हाहाकाराची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. कोरोना संकट रोखण्यासाठी तुमच्याकडे नॅशनल प्लान काय आहे? असा सवाल करतानाच व्हॅक्सीनचे वेगवेगळे दर आकारले जात आहे. त्यावर केंद्र सरकार काय करत आहे? सध्याची परिस्थिती ही राष्ट्रीय आणीबाणीच नाही काय? असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला केला आहे.

    कोरोनाच्या संकटावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. त्यावेळी कोर्टाने केंद्रावर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी केंद्र सरकारडून कोर्टाला उत्तर देण्मयात आलं आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत राज्यांना केंद्राने पत्रं पाठवलं आहे, असं केंद्राने कोर्टाला सांगितलं. त्यावर या सुनावणीचा अर्थ उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी थांबवणं नाही.

    उच्च न्यायालये स्थानिक परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणून आहेत. तर राष्ट्रीय प्रश्नांची दखल घेणं हे आमचं काम आहे. आम्ही राज्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम करू, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

    सुप्रीम कोर्टाने पाच महत्त्वाचे सवाल केंद्राला विचारले आहेत.