जगभरात व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाच्या सेवेत खंड, तब्बल ४५ मिनिटांनी झाली सेवा पूर्ववत, कारण अद्याप अस्पष्ट

व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा ४५ मिनिटं खंडित झाली होती, आता ती पूर्ववत करण्यात आली आहे, असं व्हॉट्सअपच्या वतीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कळवण्यात आलं. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०.४० वाजता व्हॉट्सअपवरून मेसेज जात नसल्याचं आणि फिड रिफ्रेश होत नसल्याचं लक्षात आलं. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट अपलोड  होत नव्हत्या आणि एरर यायला सुरुवात झाली होती. 

    जगातील सर्वात मोठा आणि बलाढ्य सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकच्या सर्व सेवा काल (शुक्रवारी) रात्री अचानक खंडित झाल्यामुळे नेटिझन्समध्ये खळबळ उडाली. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपॉट या तिन्हींची सेवा रात्रीच्या सुमाराला अचानक बंद झाली आणि काही क्षणांत नेटिझन्समध्ये यावरून चर्चा सुरू झाली.

    व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा ४५ मिनिटं खंडित झाली होती, आता ती पूर्ववत करण्यात आली आहे, असं व्हॉट्सअपच्या वतीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कळवण्यात आलं. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०.४० वाजता व्हॉट्सअपवरून मेसेज जात नसल्याचं आणि फिड रिफ्रेश होत नसल्याचं लक्षात आलं. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट अपलोड  होत नव्हत्या आणि एरर यायला सुरुवात झाली होती.

    या सगळ्यात ट्विटरची सेवा मात्र सुरळीत होती. त्यामुळे ट्विटरवर याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. तर ट्विटरच्या फिडमध्येही अडथळे येत असल्याची तक्रार काही नेटिझन्सनी केली. काही मिनिटांत १० लाखांपेक्षा अधिक इन्स्टाग्राम युझर्सच्या तक्रारी कंपनीकडे नोंदवल्या गेल्या. मात्र असं का घडलं, याबाबतचं कुठलंही स्पष्टीकऱण व्हॉट्सअप किंवा फेसबुककडून देण्यात आलेलं नाही.

    व्हॉट्सअप हे केवळ मेसेजिंग ऍप असलं, तरी त्याचा आता व्यावसायिक कारणांसाठी वापर होत  असल्यामुळे अनेकांच्या व्यवसायांवर यआणि सेवांवर याचा परिणाम झाला. अनेक कार्यालयं व्हॉट्सअपवरून कामाचं नियोजन करत असतात. त्यांच्या नियोजनातही अडथळे आले. थोडक्यात, आधुनिक काळात फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यांनी सामान्य माणसांचं आयुष्य किती व्यापलंय, याचीच प्रचिती केवळ ४५ मिनिटांच्या अडथळ्यामुळे आली.