modi feeding the peocock

भारत- चीन सीमेवर तणावाची स्थिती असतानाच भारताच्या हवाई दलात आज राफेल लढाऊ विमानांचा समावेश झाला. त्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी(asaduddin owaisi) यांनी मोदींवर(modi) टीका केली आहे. चीनच्या बाबतीत पंतप्रधानांच्या कृतीवर त्यांनी भाष्य केले आहे.

युद्धात भारताला हवाई वर्चस्व मिळवून देणाऱ्या राफेल(rafel) विमानांचा आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर हा सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर ओवेसी यांनी ट्विटच्या माध्यमातून मोदींवर टीका केली.

ओवेसी यांनी असे म्हटले आहे की, भारताचे सैन्य दलं चिनी सैन्याला उत्तर देताना चांगली कामगिरी करत आहेत. मात्र आता हे संकट लष्करापुरते मर्यादित नाही. हे आता आपल्या देशाच्या नेतृत्वाबद्दलचे आहे. मात्र ते कोणतीही कृती करत   नाहीयेत.  देशाचे पंतप्रधान का या मुद्द्यावर काही बोलत नाहीयेत. मोराला खाऊ(peocock feeding) घालण्यातून ते मोकळे होतील, तेव्हा त्यांना देशवासीयांना काही सांगायला वेळ मिळेल. मग चीनचे नाव घेण्याचे धाडसही येईल, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.