फोटो सौजन्य : एएनआय
फोटो सौजन्य : एएनआय

मुख्यमंत्री-मनोहर लाल खट्टर यांचे कौतुक करताना गडकरींनी हा किस्सा सांगितला, ज्यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बांधकामादरम्यान आपल्या सासऱ्यांच्या बाजूने पक्षपातीपणा केला नाही.

    नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बांधकामाचा आढावा घेतला. या निमित्ताने हरियाणाच्या सोहना येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरींनी देशाच्या विकासात रस्त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर देताना अनेक मनोरंजक गोष्टी सांगितल्या. ते रस्ते बांधकामातील गुणवत्ता आणि भ्रष्टाचाराशी तडजोड न करण्याबद्दल बोलले, तसेच त्यांच्या आयुष्यातील एक मजेशीर किस्साही सांगितला.

    गडकरी म्हणाले, “माझं नवीनच लग्न झालं होतं. तेव्हा माझ्या सासऱ्यांचे घर रस्त्याच्या मधोमध येत होते. तो रस्ता रामटेकमध्ये बांधला जात होता. मी माझ्या पत्नीला न सांगता सासरच्या घरावर बुलडोझर फिरवला होता आणि रस्ता बांधला होता.”

    मुख्यमंत्री-मनोहर लाल खट्टर यांचे कौतुक करताना गडकरींनी हा किस्सा सांगितला, ज्यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बांधकामादरम्यान आपल्या सासऱ्यांच्या बाजूने पक्षपातीपणा केला नाही.