chief of air

लडाखमधील सीमारेषेवरील तणावाबाबत एअर चीफ मार्शल भदोरिया म्हणाले की, चीनशी सामोरे जाण्यासाठी हवाई दलाची तयारी चांगली असून आम्ही सर्व संबंधित भागात सैन्य तैनात केले आहे. सीमेवर चीनच्या तयारीसंदर्भात हवाई दल प्रमुख म्हणाले की शत्रूला कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु “खात्री बाळगा, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी वायुसेना ठामपणे उभे आहे.”

नवी दिल्ली : लडाखच्या सीमेवर चीनशी सुरू असलेल्या संघर्षा (India-China tensions) दरम्यान “चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत” असे हवाई दलाचे प्रमुख  ( Chief of Air Force)आर के एस भदौरिया यांनी सोमवारी सांगितले. ”

लडाखमधील (Ladakh) सीमारेषेवरील तणावाबाबत एअर चीफ मार्शल भदोरिया म्हणाले की, चीनशी सामोरे जाण्यासाठी हवाई दलाची तयारी चांगली असून आम्ही सर्व संबंधित भागात सैन्य तैनात केले आहे. सीमेवर चीनच्या तयारीसंदर्भात हवाई दल प्रमुख म्हणाले की शत्रूला कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु “खात्री बाळगा, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी वायुसेना ठामपणे उभे आहे.”

हवाई दलात नुकतीच औपचारिकपणे दाखल झालेल्या राफेल लढाऊ विमानांबद्दल एअरचिफ मार्शल म्हणाले की त्यांच्या तैनातीमुळे हवाई दलाला एक परिचालन मजबूती मिळाली. देशासमोरची सध्याची आव्हाने जटिल असल्याचे वर्णन करताना ते म्हणाले की आम्ही दोन आघाड्यांवरील युद्धासह कोणत्याही संघर्षासाठी तयार आहोत.