onion export

केंद्र सरकारने गेल्या पंधरवड्यामध्ये सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर (Export) सरसकट बंदी घातली होती. मात्र, मात्र, सरकारने आता पुन्हा कांद्याच्या निर्यातीला परवानगी (Permission) दिली आहे. सरकारकडून बंगळुरू रोज आणि कृष्णापुरम या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्यात आली आहे.

 नवी दिल्ली : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Growers farmers) एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय केंद्र सरकाकडून (Central Government) घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने गेल्या पंधरवड्यामध्ये सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर (Export) सरसकट बंदी घातली होती. मात्र, मात्र, सरकारने आता पुन्हा कांद्याच्या निर्यातीला परवानगी (Permission) दिली आहे. सरकारकडून बंगळुरू रोज आणि कृष्णापुरम या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्यात आली आहे.

३१ मार्च २०२१ पर्यंत बंगळुरू रोज आणि कृष्णापुरम कांद्याची १० दहा हजार टनांपर्यंत निर्यात करता येईल. या दोन्ही कांद्याची निर्यात फक्त चेन्नई बंदरातून करता येणार आहे. ही वाहतूक २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करावी लागेल, असे विदेश व्यापार महासंचालनालयाने म्हटले आहे. निर्यातदारांना कर्नाटक सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे असल्याचे सरकारने काढलेल्या निवदेनात म्हटले आहे.

बाजारपेठेत समतोल राखण्यासाठी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केली होती. मात्र, आता निर्यातीला सरकारने परवानगी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्टपर्यंत कांद्याचे दर स्थिर होते. मात्र, सप्टेंबरमध्ये अचानक कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली. परंतु आता केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्राला अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याला  कांदा निर्यातीसाठी हिरवा कंदील कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.