शाळा कधी सुरू होणार ? पण शाळेची फी भरवीच लागणार, सर्वोच्च न्यायालयाचा पालकांना मोठा धक्का

कोरोना लॉकडाऊन (Lock Down) काळातील शाळांची फी (School Fees) पूर्णच्या पूर्ण भरावीच लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पालकांनी (Parents) २०१९-२० च्या शैक्षणिक वर्षात जेवढी फी भरली, तेवढीच फी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळांकडे जमा करावी, असा अंतरिम आदेश न्यायालयाने (SC) दिला आहे. या निकालामुळे पालकांना धक्का बसला आहे.

    कोरोनाच्या प्रादुर्भाव (Corona Virus) अधिकपटीने वाढू नये, यासाठी राज्य सरकारने (State Government) अनेक दुकानांसह शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं उपलब्ध करून दिलं होतं. परंतु विद्यार्थ्यांच्या (Students) शाळा कधी सुरू होणार? त्यांच्या परीक्षांचं काय होणार ? तसेच माझ्या मुलाला शाळेत पाठवल्यावर कोरोना संसर्ग झाला तर ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न पालकांसमोर उपस्थित झाले होते. त्यामुळे ऑनलाईन माध्यम हे एकच स्वरूपाचं आणि सहजरित्या शिक्षण उपलब्ध करून देणारं माध्यम आहे. त्यामुळे आता शिक्षकांना पगार कुठुन मिळणार ? याकडे केंद्र सरकारचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे शाळेची फी भरवीच लागणार असल्याचा मोठा धक्का सर्वोच्च न्यायालयाने पालकांना दिला आहे.

    कोरोना लॉकडाऊन काळातील शाळांची फी पूर्णच्या पूर्ण भरावीच लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पालकांनी २०१९-२० च्या शैक्षणिक वर्षात जेवढी फी भरली, तेवढीच फी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळांकडे जमा करावी, असा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे पालकांना धक्का बसला आहे. लॉकडाऊन काळात नोकरी-व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे या अवधीत शाळांच्या शुल्कमाफीबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती विविध याचिकांद्वारे करण्यात आली होती.

    त्यावर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी नुकताच निर्णय दिला. लॉकडाऊनमुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील शाळांची फी पूर्णपणे माफ होईल किंवा फीमध्ये सवलत मिळेल, या आशेवर राहिलेल्या देशभरातील पालकांना न्यायालयाच्या निकालाने मोठा धक्का दिला आहे.